पाणीपट्टी दरवाढ व मलजल उपभोक्ता शुल्काबाबत मनपाचा दिलासादायक निर्णय
नाशिक :- पाणीपट्टी दरवाढ व मलजल उपभोक्ता शुल्काला स्थगिती; नाशिककरांना दिलासा.
नाशिक : महानगरपालिकेने स्थायी समितीच्या सभेत घेतलेला पाणीपट्टी दरवाढीचा व मलजल उपभोक्ता शुल्क आकारणीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. यामुळे पूर्वीप्रमाणेच नाशिककरांना पाणीपट्टी आकारली जाईल,नाशिककर जनतेची मागणी व त्यांच्या भावनांचा विचार करता हि दरवाढ रद्द।करण्यात आली असल्याची माहिती माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिली आहे. या निर्णयाबाबत पालकमंत्री आणि मनपा आयुक्त यांच्यांत या बाबत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस कर उपायुक्त श्रीकांत पवार उपस्थित होते.
Comments
Post a Comment