नविन नाशिक पाणीपुरवठा बाबत मनपाची नागरिकांना सुचना

नाशिक :- नविन नाशिक विभागातील प्र क्र २४ मधील लेखानगर जलकुंभास मोठया प्रमाणात पाणी गळती सुरु असुन सदर जलकुंभाचे दुरुस्तीचे व जलकुंभाचे वॉटर प्रुफिंग करणेचे काम तातडीने सुरु करणे आवश्यक असल्याने पाणी पुरवठा विभागामार्फत लेखानगर जलकुंभ दुरुस्तीचे व वॉटर प्रुफिंग करणेचे काम  दि. ०४/१२/२०२३ ते दि. ०३/०१/२०२४ पर्यंत करण्यात येणार आहे. सदर कामाचे कालावधीत सदर भागात बायपासने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी देखील लेखानगर जलकुंभावरुन खालील भागामध्ये होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही नम्र विनंती.

प्र क्र २४ मधील लेखानगर जलकुंभ परिसर
स्टेट बैंक कॉलनी, पिरबाबाचौक, राणाप्रताप चौकातील भाग, मृत्यूंजय महादेव,मंदिर, झिनत कॉलनी, इंदिरा नगर वसाहत १, २, बालभारती, तुळजाभवानी चौक, जुने सिडको शिवाजीचौक परिसर, अचानकचौक, सारंगचौक, वंदेमातरमचौक, शनि मंदिर परिसर, एन-३ एल सेक्टर, एन-९ पीजीर, लेखानगर मिलटरी कॉलनी, गजानन चौक, सप्तश्रृंगी चौक परिसर, महादेवचौक, खंडेराव परिसर, गोपाळकृष्णचौक
तरी लेखानगर जकुंभाचे दुरुस्तीचे व वॉटरप्रुफिंग करणेचे काम सुरु असे पर्यंत परीसरातील नागरीकांनी मनपास सहकार्य करावे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन