गोदावरी प्रदूषण नियंत्रण बाबत मनपा आयुक्त डॉ अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

नाशिक :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) गोदावरी नदीत सांडपाणी मिश्रित होणार नाही  याबाबत दक्षता घेऊन त्या संदर्भातील उपाय योजना करावी व  त्याबाबतचे काम करणेबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांनी दिले.मा.विभागीय आयुक्त यांचे निर्देशानुसार गोदावरी प्रदूषण नियंत्रण बाबत दरमहा उपसमितीची बैठक घेण्यात येते. आज मनपा मुख्यालयात प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी बैठक पार पडली.गोदावरी प्रदूषण नियंत्रण बाबत नियमित आढावा घेण्यात आला.दरम्यान डॉ.करंजकर यांनी गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. गोदावरी नदी पात्रात सांडपाणी मिश्रित होऊ नये या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्या त्याचे  नियोजन करावे गोदावरी नदीत सांडपाणी सोडणारे व्यावसायिक,उद्योजक,कारखानदार व कचरा टाकणाऱ्या  नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निर्देश संबंधित विभागांना दिले.  या पार्श्वभूमीवर नंदिनी नदीचा अंबड लिंक रोडवरील पूल, शिवम थेटर येथील पूल, गोरक्षनाथ पूल, सद्गुरु नगर जवळील चिखली नाला गंगापूर रोड येथील चिखली नाला, परीचा बाग येथील गोदावरी किनार, चोपडा लॉन्स जवळील नाला आदींसह इतर नाल्यांचे पाणी गोदावरी प्रदूषित होऊ नये यासाठी पाहणी केली.

या बैठकी प्रसंगी माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख उपायुक्त डॉ विजयकुमार मुंडे,अतिक्रमण विभागाचे उपायुक्त नितीन नेर,कार्यकारी अधीक्षक अभियंता मलनिःसारण संजय अग्रवाल,घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड, कार्यकारी अभियंता गणेश मैंड,  गोदावरी कक्षाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे ,जितेंद्र पाटोळे,उपअभियंता नितीन राजपूत,रवी पाटील,जितेंद्र कोल्हे प्रशांत बोटसे अशासकीय सदस्य राजेश पंडित व निशिकांत पगारे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद विभागीय स्वच्छता निरीक्षक गोसावी,बागुलआदी अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन