बागलाण तालुक्यातील धांद्री येथे मराठा आरक्षण प्रश्नी ग्रामस्थांचे,साखळी उपोषण
बागलाण :- तालुक्यातील धांद्री येथे मराठा आरक्षण प्रश्नी साखळी उपोषणला सुरुवात काल मंगळवार पासून करण्यात आली.मराठा आरक्षण करिता अंतरावली सराटी जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच जय भवानी जय शिवाजी यळकोट यळकोट जय मल्हार चा जागर करुण उपोषण सुरु झाले.
प्रसंगी धांद्री गावातील ग्रामस्थांनी विचार व्यक्त करुण मराठा व धनगर समाजाला आरक्षण गरजेचे आहे शासनाने त्वरित दखल घेऊन आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अन्यथा आंदोलनाचा उद्रैक होईल व हे आंदोलन सरकारला परवडणार नाही आमच आंदोलन शांततेच्या मार्गाने असुन याचा उद्रेक होवु नये याची दखल शासनाने घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला.
Comments
Post a Comment