विविध ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे महसूल गुप्तचर विभागाने केले उघड


नवी दिल्ली :- संपूर्ण भारतभरात टाकलेल्या धाडसत्रात सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे महसूल गुप्तचर विभागाने (डीआरआय) उघड केले आहे. या कारवाईत 13/14.10.2023 रोजी 31.7 किलो सोने जप्त करण्यात आले. जमीन/रेल्वे मार्गाने सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच टोळ्यांचा भाग असलेल्या दुसर्‍या शाखेचेही बिंग विभागाने फोडले.

बसमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन व्यक्तींना डीआरआय मुंबईच्या पथकाने पुण्याजवळ पकडले. त्यांच्याकडून 30.10.2023 रोजी रात्री उशिरा 5 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील एका गावातील एका हँडलरची माहिती समोर आली. वेगाने कारवाई करत, 31.10.2023 रोजी सकाळी डीआरआय अधिकार्‍यांनी त्याच्या घराची झडती घेतली. यातून त्याच टोळीचे आणखी दोन हँडलर वाराणसीहून नागपूरला सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर, ही माहिती वाराणसीच्या डीआरआयला देण्यात आली. त्यांनी तातडीने पावले उचलली आणि 31.10.2023 रोजी आणखी 8.7 किलो तस्करीचे सोने जप्त करत दोन हँडलरना अटक केली.

मुंबई, गोवा प्रादेशिक विभाग आणि वाराणसी डीआरआय पथकांच्या एकत्रित कारवाईमुळे 8.5 कोटी रुपये किमतीचे एकूण 13.7 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 3 जणांना मुंबई आणि 2 जणांना वाराणसीत अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई, विविध टोळ्यांच्या खुलेआम तस्करी कारवायांना पायबंद घालण्यासाठी समन्वित दृष्टीकोन स्वीकारण्याच्या महसूल गुप्तचर विभागाच्या क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन