जनता विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. २८/११/२०२३ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन इ. ८ वी क च्या वर्गाने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समुद्धी बोडके हिने केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एस.डी. शिंदे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर कु. आदित्य करचे व आदिती खरात यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व त्यांचे शिक्षणाविषयीचे धोरण कसे होते याची विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. यानंतर कु. प्रसाद भालेकर याने महात्मा फुले यांच्या वरील स्वरचित काव्य “ स्त्री शिक्षणाची सावली ” हे सादर केले. हर्षिता गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एस.डी. शिंदे, ज्येष्ठ शिक्षिका के.एस. आगळे , वाघ मॅडम उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना गोवर्धने मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment