Posts

चर्मकार समाजासाठीच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Image
पशुसंवर्धन विभागातील ११५९ रिक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता – प्रधान सचिव जे. पी. गुप्ता मुंबई, ‍‍दि.०८ : चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी २०२३-२४ या वर्षासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. राज्य शासनाच्या अनुदान योजना ५० हजार रुपये आणि बीज भांडवल योजनेंतर्गत रु. ५०,००१ ते ५ लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. मार्फत मुदती कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, सुक्ष्म पत पुरवठा योजना, शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जाणार आहेत. एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्यामार्फत मुदती कर्ज योजनेंतर्गत २.५० लाखावरून ५ लाखापर्यंत महिला समृद्धी योजना ५० हजार रुपये वरून १.४० लाखापर्यंत, लघुऋण वित्त योजना ५० हजार रुपये वरून १.४० लाखापर्यंत व महिला समृद्धी योजनेंतर्गत ५० हजार रुपये कर्ज देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी शास...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Image
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता मुंबई, दि. 8 : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे भगवे वादळ येणार - भाऊसाहेब चौधरी शिवसेना सचिव

Image
देवळाली :- देवळाली विधानसभा मतदार संघांतील ६६ शाखाप्रमुख यांना शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप २० सप्टेंबर पासुन देवळाली मतदार संघात गांव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक मोहीमेअंतर्गत १०१ शाखांचे भव्य उद्धघाटन सोहळ्याला होणार प्रारंभ, नाशिक शिवसेना कार्यालयामध्ये देवळाली मतदारसंघातील शाखाप्रमुखकांची बैठक संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी,नाशिक लोकसभेचे कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे,सहसंपर्कप्रमुख गणेश कदम,राजू अण्णा लवटे,काशिनाथ मेंगाळ,जिल्हाप्रमुख अनिल ढिकले,अजय बोरस्ते,जिल्हा संघटक योगेश म्हस्के, महानगर प्रमुख प्रविन तिदमे आदी होते. नाशिक लोकसभा ग्रामीणच्या पहिल्याच बैठकीला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे शिवसेना कार्यालय गर्दीने गेले व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत नाशिक तालुकाप्रमुख लकी ढोकणे यांनी केले, लकी ढोकणे यांची नाशिक तालुकाप्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर देवळाली मतदारसंघात १०१ शाखांचे भव्य उदघाटन सोहळ्याची तयारी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, जिल्हा संघटक ...

शिक्षक हे समाज व देश घडविणारे आधारस्तंभ - प्रा.सत्यम साहेबराव चव्हाण

Image
देवळा :- कुंभार्डे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.शिक्षक हे समाज व देश घडविणारे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन कुंभार्डे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सत्यम साहेबराव चव्हाण यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले. जनता उच्च, व माध्यमिक, विद्यालय कुंभार्डे येथे डॉ, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस तथा शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा.सत्यम चव्हाण बोलत होते.ते पुढे म्हणाले शिक्षकाशिवाय ज्ञान प्रसाराचे काम होऊ शकतच नाही समाज घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात शिक्षकांच्या प्रती समाजात प्रचंड  आदर असतो. साधी राहणी व उच्च विचारसरणी यातून जसे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कार्य केले.भारताचे राष्ट्रपती असताना सुद्धा त्यांनी स्वतःत मधील शिक्षक जागृत ठेवला व माझा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे सांगितले त्याची दखल घेऊन सरकारच्या वतीने  5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो." कार्यक्रम प्रसं...

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे उद्या वितरण

Image
मुंबई, दि. 4 – शालेय शिक्षण विभागामार्फत सन 2022-23 च्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे मंगळवार दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनी वितरण करण्यात येणार आहे. हा समारंभ दि. 5 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 4 वाजता टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), नरीमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आदी उपस्थित राहतील. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने क्रांतिज्य...

मखमलाबाद विद्यालयात पर्यावरण पुरक "रक्षाबंधन" कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

Image
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे पर्यावरण पुरक रक्षाबंधन कार्यक्रम मविप्र संचालक रमेश पिंगळे व प्राचार्य संजय डेर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पर्यावरण पुरक म्हणजे विविध रंगीत कागदांपासुन बनविलेली भव्य राखी स्टेजसमोरील निंबाच्या झाडाला बांधण्यात आली.कु.वेदिका पवार हिने रक्षाबंधन विषयी आपले मनोगत व्यक्त केले.संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की,"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी" म्हणजे निसर्गातील वृक्ष,वेली हे सुध्दा आपले कुटुंब, बहीण-भाऊ आहेत.कारण वृक्ष,वेली,निसर्ग हे आपले रक्षण करतात.विद्यार्थ्यांना रोज या वृक्षाची सावली मिळते,म्हणुन मान्यवरांच्या उपस्थितीत या वृक्षाला राखी बांधुन एक आगळा-वेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला.कु.शिवानी सुर्यवंशी व कु.श्रावणी मौले यांनी अतिशय सुंदर अशी रंगीत कागदांपासुन भव्य राखी बनविली.सुत्रसंचालन कु.समृध्दी अहिरे हिने तर आभार प्रदर्शन कु.अक्षरा पंचभैय्ये हिने केले.इ.९ वी ड च्या या सर्व विद्यार्थ्यांना वर्...

आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटना,डहाणू तालुका अध्यक्षपदी यशवंत गडग यांची नियुक्ती

Image
पालघर :-  आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटना पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू तालुका अध्यक्ष  यशवंत रामा गडग मुक्काम पोस्ट निकणे तालुका डहाणू जिल्हा पालघर यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती पत्र देताना पालघर जिल्हा सचिव किशन चव्हाण आणि राकेश करबट,राजू गणेश गडग,अजय सालकर, मिथुन वरखंडे, डहाणू तालुक्यातील आदिवासी अस्मिता संघटना कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते सर्व डहाणू तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.