मखमलाबाद विद्यालयात पर्यावरण पुरक "रक्षाबंधन" कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे पर्यावरण पुरक रक्षाबंधन कार्यक्रम मविप्र संचालक रमेश पिंगळे व प्राचार्य संजय डेर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पर्यावरण पुरक म्हणजे विविध रंगीत कागदांपासुन बनविलेली भव्य राखी स्टेजसमोरील निंबाच्या झाडाला बांधण्यात आली.कु.वेदिका पवार हिने रक्षाबंधन विषयी आपले मनोगत व्यक्त केले.संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की,"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी" म्हणजे निसर्गातील वृक्ष,वेली हे सुध्दा आपले कुटुंब, बहीण-भाऊ आहेत.कारण वृक्ष,वेली,निसर्ग हे आपले रक्षण करतात.विद्यार्थ्यांना रोज या वृक्षाची सावली मिळते,म्हणुन मान्यवरांच्या उपस्थितीत या वृक्षाला राखी बांधुन एक आगळा-वेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला.कु.शिवानी सुर्यवंशी व कु.श्रावणी मौले यांनी अतिशय सुंदर अशी रंगीत कागदांपासुन भव्य राखी बनविली.सुत्रसंचालन कु.समृध्दी अहिरे हिने तर आभार प्रदर्शन कु.अक्षरा पंचभैय्ये हिने केले.इ.९ वी ड च्या या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका अश्विनी वडघुले यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment