मनपाच्या वतीने शहीद व स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान
नाशिक :- केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मेरी माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत विरो का वंदन या कार्यक्रमात शहीद व स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान सोमवार दि.२८ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत शासन निर्देशानुसार विरो का वंदन या कार्यक्रमांतर्गत नाशिक शहरातील शहीद व स्वातंत्र्यसैनिक तसेच शहरातील पोलीस दलातील शहीद यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान नाशिक महापालिकेच्या वतीने सोमवार दि.२८ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन,पूर्व गेट,शहराचे प्रथम महापौर शांताराम (बापू) वावरे यांच्या पुतळ्या समोरील वाहनतळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने या अभियानाचे समन्वयक तथा उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment