मनपा आयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर यांच्या हस्ते विशेष मिशन इंद्रधनुष ५.० ला सुरुवात करण्यात आली.
नाशिक :-(प्रतिनीधी समाधान शिरसाठ) नाशिक महानगरपालिका क्षेत्रात आज दिनांक ७ ऑगस्ट २०२३ पासून प्रशासक तथा आयुक्त्त डॉ.अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मिशन इंद्रधनुष ५.० ला सुरुवात करण्यात आली.
यामोहिमेचे उद्धघाटन बुद्ध विहार,सम्राट नगर,दिंडोरी रोड येथे नाशिक मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते ,सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अजिता साळुंखे,पंचवटी विभागीय अधिकारी योगेश राकटे,जागतिक आरोग्य संघटनेचे नाशिक विभागाचे प्रतिनिधी डॉ.प्रकाश नांदापूरक, यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.बालकांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी वेगवेगळी लसीकरण करण्यात येते.विशेषतः शून्य ते पाच वयोगटातील बालकांमध्ये होणारे लसीकणार महत्वाचे ठरते. संसर्गजन्य आजार किंवा दुर्धर आजाराची लागण होत बालमृत्यू होऊ नये त्याकरिता हे लसीकरण महत्वाची भूमिका निभावते. वयोगटानुसार बालकांना नियमियतपणे पोलिओ,बीसीजी,पोलिओ बूस्टर,कावीळ,गोवर,वेगवेगळी जीवनसत्वे,कांजण्या,यासह नियमित लसीकणांतर्गत जे आवश्यक आहे ते लसीकरण होणे गरजेचे आहे. तसेच आपल्या घराशेजारी परिसरातील पालकांना बालकांचे लसीकरण करण्यासाठी आवाहन करावे. असे प्रतिपादन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नितीन रावते यांनी केले.ही मोहिम तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.पहिला टप्पा ७ ते १२ ऑगष्ट २०२३, दुसरा टप्पा ११ ते १६ सप्टेंबर २०२३ व तिसरा टप्पा ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे.या उद्धघाटना प्रसंगी मिशन इंद्रधनुष मोहिमेचा ध्वज फडकवून मिशनला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर नाशिक मनपाचे अधिकारी व आरोग्य कर्मचारी,सामाजिक कार्यकतें यांनी गौडवाडी,फुलेनगर आदी परिसरात जाऊन नागरिकांना मिशन इंद्रधनुष मोहिमे अंर्तगत आपल्या लहान बालकांचे लसीकरण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या उद्धघाटना प्रसंगी नाशिक मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नितीन रावते,सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अजिता साळुंखे,पंचवटी विभागीय अधिकारी योगेश रकटे,जागतिक आरोग्य संघटनेचे नाशिक विभागाचे प्रतिनिधी डॉ.प्रकाश नांदापूरकर,मोहिमेचे नोडल अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर,युनिसेफ संघटनेचे समन्वयक डॉ.सुमेध कुदळे,डॉ.नयना शार्दुल,डॉ.ऋषिकेश शेवाळे,परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे, संतोष जाधव,आरोग्य परिचारिका सौ.दराडे ,कुलकर्णी,शिरसाट आरोग्य कर्मचारी प्रकाश भोये,विशाल बागुल यावेळी उपस्तित होते.
Comments
Post a Comment