मखमलाबाद विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर पर्यवेक्षिका माधुरी थेटे,जेष्ठ शिक्षक अनिल पगार,वर्षा पाटील,अश्विनी वडघुले,सारिका पांगारकर,मोनाली बेंडकुळे,योगिता रोडे,सोनल घडवजे व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.कु.वेदिका बस्ते हिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.अहिल्यादेवी होळकर या इंदूरच्या माळवा प्रांताचे जहागीरदार असलेल्या होळकर घराण्यातील "तत्वज्ञानी महाराणी" होत.त्यांनी इंदूरच्या दक्षिणेस नर्मदा तीरावर असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हारराव होळकर यांनी त्यांना प्रशासकिय व सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते.त्या आधारे अहिल्याबाईंनी इ.स.१७६६ ते इ.स.१७९५ म्हणजे त्यांच्या मृत्युपर्यंत माळव्यावर राज्य केले.त्यांनी भारतात विशेषतः महाराष्ट्र,मध्यप्रदेशमध्ये विविध मंदिरांचे बांधकाम,तिर्थक्षेत्रांच्या नदिकिनार्यावरील घाट,पाण्यासाठी विहीर,बारव अशी समाजउपयोगी महत्वपूर्ण बांधकामे त्यांच्या कार्यकाळात केलेली आहेत व आजही ती सर्व कामे सुस्थितीत आहेत.कु.पुष्कर भोये,कु.सायली गवळी,कु.प्रथमेश मुंढे यांनीसुध्दा या परिपाठात सहभाग घेतला.सुत्रसंचलन कु.सार्थक कापडणीस याने केले.या सर्व इयत्ता ९ वी अच्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सारिका पांगारकर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment