मखमलाबाद विद्यालयात समाजदिनानिमित्त आयोजीत चित्रकला स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद
मखमलाबाद (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे मविप्र समाजदिनानिमित्त उदाजी महाराज संग्रहालय व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी अ गट इ.५ वी ६ वी व ब गट इ.७ वी ते ९ वी असे दोन गट होते.या दोन्ही गटांमध्ये एकुण ५०४ विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे,सुधीर तांबे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment