नाशिक महानगरपालिकेच्या वतीने चांद्रयान-३ यशस्वी लँडिंग निमित्ताने मनपात जल्लोष
नाशिक :- मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे भारत देशाचा अभिमान आन-बान शान चांद्रयान-३ च्या पार्श्वभूमीवर भारतीय विरोका वंदन वैज्ञानिकांचे अभिनंदन या जय घोषात उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे चांद्रयान३ सेल्फी पॉईंट करण्यात आला होता. तसेच या उत्सवानिमित्त स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.
नाशिक मनपात चांद्रयान ३ च्या यशाबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
२३ऑगस्ट रोजी भारताने चांद्रयान ३ ला यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचवले व प्रत्येक देशवासीयाचा आनंद गगनात मावेनासा झाला. नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी देखील याला अपवाद ठरले नाही. आज नाशिक महानगरपालिकेत चंद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण झाल्याबद्दल राजीव गांधी भवन येथे हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी चांद्रयानाची प्रतिमा पुष्पांद्वारे सजवण्यात आली होती. तसेच सेल्फी पॉईंट द्वारे कर्मचाऱ्यांना हा आनंद उत्सव साजरा करण्याची संधी जनसंपर्क विभागाने कर्मचाऱ्यांना प्राप्त करून दिली. हा उत्सव साजरा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जनसंपर्क विभागाने रेखाटलेल्या फलकावर स्वाक्षरी करून आपला आनंद व्यक्त केला.
या उत्सव कार्यक्रमात मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवीला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त भाप्रसे भाग्यश्री बानायत,अतिरिक्त आयुक्तप्रदीप चौधरी,उपायुक्त प्रशांत पाटील,मुख्य वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन रावते,अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,उद्यान अधीक्षक विवेक भदाणे कार्यकारी अभियंता प्रकाश निकम,सचिन जाधव,जितेंद्र पाटोळे,गणेश मैंड, उपअभियंता नितीन राजपूत, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कोशिरे,डॉ.जितेंद्र धनेश्वर,आदींसह सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment