प्रत्येकासोबत आत्मिक भाव ठेवून भेटले पाहिजे, रक्षाबंधन सणामागील मतितार्थ- ब्रह्माकुमारी शक्ती दीदी
नाशिक रोड :- भगवंत आपले बिघडलेले कामही व्यवस्थित रित्या करून करून देत असतो फक्त आवश्यकता आहे ती भगवंताच्या निरंतर आठवणीत राहण्याची आपण सर्व एक निराकार एक निराकार शिव परमात्म्याची संतान आहोत परमात्मा सांगतात की प्रत्येकासोबत आत्मिक भाव ठेवून भेटले पाहिजे रक्षाबंधन या सणामागील सुद्धा हाच मतितार्थ आहे की आपण एक परमात्म्याची संतान असून आपसात भाऊ-बहीण आहोत. आपले हे अति प्राचीन नाते आहे या नात्यामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पवित्रता होय. रक्षाबंधन हा पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे यातून विकारांपासून आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा सण साजरा केला जातो, असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी शक्ती दीदी यांनी केले
येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातर् केंद्रातर्फे दिनांक 27 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन होते त्याचे प्रतीक रक्षाबंधनाचे अध्यात्मिक रहस्य या विषयावर व्याख्यान व रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आशीर्वचन देताना ब्रह्माकुमारी शक्ती दीदी बोलत होत्या. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका कोमल मेहरोली या व कदम लॉन्स चे संचालक फकीरराव कदम उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माजी नगरसेविका कोमल ताई मेहरोली या यांनी सांगितले की आपण रक्षाबंधन सण नेहमीच साजरा करीत असतो परंतु आज या सणामागील अध्यात्मिक रहस्य दीदींनी उलगडून सांगितले की जे आपल्या जीवनासाठी अतिशय उपयुक्त ठरेल
आमच्या मातोश्री व काकू ब्रह्माकुमारी संस्थेच्या नियमित संपर्कात असून लहानपणी आपणही स्वतः या संस्थेच्या कार्याने प्रभात झाली होतो असाही स्वा अनुभव कोमलताई यांनी याप्रसंगी सांगितला.
ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर ब्रह्माकुमारी प्राजक्ता यांनी रक्षाबंधनाचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करून रक्षाबंधनाचे या काळातील महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ब्रह्माकुमारी भगिनींनी उपस्थित सर्वांना रक्षासूत्र बांधुन आध्यात्मिक जीवनात अग्रेसर होण्यासाठी आशीर्वाद दिले. ब्रह्मकुमारी शक्ती दि दी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करून ईश्वरीय भेट वस्तू देण्यात आली.
Comments
Post a Comment