सटाणा पोलिसांनी अट्टल सोनसाखळी चोरांना ठोकल्या बेड्या १ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
याबाबत सविस्तर वृत्त असे कि सटाणा येथिल न्यु प्लांट कचेरी रोडवरील चंद्रकला रमेश वाघ यांच्या घरात तेथील महिला घरकामात मग्न असल्याचे बघून दोन्ही संशयीत आरोपी यांनी घरात घुसून घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम हातोहात घेऊन पोबारा केला होता. याबाबत घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच चंद्रकला वाघ यांनी सटाणा पोलीसात भादवी कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सटाणा पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक चिलूमुला रजनीकांत, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपुत पोलीस उपनिरीक्षक विजया पवार पोलीस हवालदार जिभाऊ पवार, धनंजय बैरागी, वाडीलाल जाधव यांनी तपासाचे चक्र फिरवून व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून संशयित आरोपी प्रसाद दादाजी निकम ( वय ३० रा सटाणा ) व त्याचा साथीदार तोफिक अब्दुल शेख ( वय ३१ रा सटाणा ) यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे त्यांची कसुन तपासणी केली असता त्याने सदरच्या चोरीची कबुली दिली आहे.
अजूनही त्यांनी सटाणा शहरासह परिसरात कुठे कुठे घरफोडी करून डल्ला मारला आहे. याची माहिती मिळवण्यासाठी सटाणा पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरचे सोन्याचे दागिने परत मिळवून आरोपींना बेड्या ठोकल्या बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व पोलीस उप अधिक्षक पुष्कराज सुर्यवंशी यांनी सटाणा पोलीसांचे कौतुक केले आहे.
Comments
Post a Comment