विषय:- चंद्रयान-3 अभियान यशस्वी झाल्यामुळे आम आदमी पार्टीतर्फे पेढे आणि चॉकलेट वाटप
नाशिक : इस्त्रोच्या (ISRO) चांद्रयान 3 मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटानी चांद्रयान 3 चंद्राच्या पुष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच दक्षिण ध्रुवावर उतरणारा भातर पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश झाला आहे.
चंद्रयान-3 अभियान यशस्वी झाल्यामुळे आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने दूध बाजार येथे नाशिककरांना पेढे आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि या अभियानास यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांचे आम आदमी पार्टी नाशिक अभिनंदन करीत असून त्यांचे आभार मानत आहे. ह्यावेळी राज्य संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया, राज्य मीडिया प्रमुख चंदन पवार, देवळाली विधानसभा अध्यक्ष गिरीश उगले पाटील, पदाधिकारी प्रदीप लोखंडे,शखील शेख, दीपक सरोदे, अमित यादव, नूतन कोरडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment