येवला अमरधाम महादेवाच्या मंदिरात नागाचे दर्शन इंडियन कोब्रा जातीचा नाग
येवला :- येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये नागदेवाने दर्शन दिल्याची घटना घडली.दुपारच्या सुमारास वडगाव येथील संदीप शिंदे हे दर्शनासाठी आले असता त्यांना मंदिर गाभाऱ्यात नाग दिसताच त्यांनी त्वरित स्थानिक नागरिकांना सांगितले असता यावेळी सर्पमित्र दीपक सोनवणे यांना त्वरित पाचारण करण्यात आले.सर्पमित्र येण्यास थोडा विलंब झाल्याने मंदिरात नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती.सर्पमित्राने मोठ्या शिताफीने नागास मंदिराच्या गाभाऱ्यातून रेक्यु करून ताब्यात घेतले असून त्याला नैसर्गिक आदिवासात सोडून देण्यात आले.
येवला येथील वनविभाग प्रादेशिक कार्यालय अंगणगाव येथे या नागाची नोंद करण्यात आली.हा इंडियन कोब्रा जातीचा नाग असून जवळपास चार ते साडेचार फूट लांबीचा नाग असल्याची माहिती सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment