मुंबई येथे स्वराज्य पक्षाच्या पहिल्या वर्धापन दिनाला नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार - करन गायकर


नाशिक :- स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आज नगर जिल्ह्याची बैठक शासकीय विश्रामगृह संगमनेर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या आढावा बैठकील स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख करण गायकर,उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख मनोरमा पाटील तसेच राज्य कार्यकारणी सदस्य नवनाथ शिंदे,पुष्पाताई जगताप,वैभव दळवी उपस्थित होते.
स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वराज्य पक्षाचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे रविवार दिनांक २७ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण हॉल मुंबई मंत्रालयाजवळ आयोजित करण्यात आला असून. कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यातून जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने स्वराज्यचे शिलेदार त्या ठिकाणी उपस्थित राहणार असून संपूर्ण मुंबईमध्ये स्वराज्य चे भगव वादळ धडकणार असल्याचा संकल्प सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला आहे.या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख इंजि.आशिष कानवडे यांनी केले.
नगर जिल्ह्यातील विविध आघाडीचे जिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख,महानगरप्रमुख,जिल्हा पदाधिकारी,उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी,राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर यांनी बोलतांना सांगितले की स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पक्ष प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या झपाट्याने वाढत असून शेती, सहकार,कामगार,शिक्षण,आरोग्य,या पंचसूत्री प्रमाणे आपण वर्षभरात जे काही काम केले आहे.त्या कामाचा लेखाजोखा या वर्धापन दिनात सादर होणार असून या नियोजित संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली,कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यातून मुंबईकडे हजारोंच्या संख्येने स्वराज्य पक्षाचे शिलेदार घेऊन जायचे आहे. निश्चितपणे या नगर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी ती जबाबदारी काटेकोरपणे पाळतील जिल्हाप्रमुख इंजि.आशिष कानवडे यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने काम उभ राहत असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने स्वराज्य वाढविण्यासाठी काम केले पाहिजे.त्याचप्रमाणे आढावा बैठकीसाठी उपस्थित पदाधिकारी यांचे आभार मानत जिल्ह्यामध्ये स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून अनेक तालुक्यामध्ये जे पदाधिकारी चांगले काम करत आहे त्या सर्वांचे अभिनंदन केले.
त्याच बरोबर तालुक्यातून येणाऱ्या सर्व पदाधिकारी यांनी सोबत येणाऱ्या प्रत्येक बांधवांची यादी बनवून सर्वांनी प्रवासाचे काटेकोर नियोजन योग्य वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना  यावेळी देण्यात आल्या.

या बैठकीला उत्तर जिल्हाप्रमुख इंजि आशिष कानवडे,उत्तर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ पुजाताई पारखे,उत्तर जिल्हा उपाध्यक्ष सौ वैशालीताई खरात,दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप औटी,तालुकाध्यक्ष संदिप राऊत,शहरध्यक्ष निलेश पवार,शहर उपअध्यक्ष विनोद कोकणे,युवक तालुका उपध्यक्ष विशाल कदम,विद्यार्थी तालुका अध्यक्ष जयराज दुशिंग,तालुका संघटक लक्ष्मण सातपुते,राजुर शहर अध्यक्ष माधुरीताई देशमुख,शिर्डी विद्यार्थी अध्यक्ष यश केदारे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकी मध्ये काही नवीन पदाधिकाऱ्यांना नवीन पदनियुक्ती देऊन स्वराज्य ची जबाबदारी सोपविण्यात आल्या.
या बैठकी प्रसंगी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार संगमनेर तालुकाप्रमुख संदीप राऊत यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला