पक्षवाढीसाठी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करावा – मंत्री छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सोशल मीडिया शिबिराचे उद्दघाटन
नाशिक :- राजकारणात काम करत असतांना सोशल मीडिया हे माध्यम तितकच महत्वाचं आहे. सोशल मीडिया हा राजकारणाचा अविभाज्य भाग बनला आहे. पक्षाच्या विचारसरणी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व पक्ष वाढीसाठी या माध्यमाचा सदुपयोग करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्तर महाराष्र्ो सोशल मीडिया’ शिबिराचे उद्दघाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष गोरख बोडके, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, नाना महाले, माजी आमदार जयवंतराव जाधव, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, सोशल मीडिया तज्ञ पराग पाटील, सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे, प्रदेश समन्वयक डॉ.कपिल झोटिंग युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, चेतन कासव, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगीता आहेर, माजी नगरसेविका कविता कर्डक, सुनीता निमसे, युवक प्रदेश उपाध्यक्ष गौरव गोवर्धने, समाधान जेजुरकर, संजय खैरनार, कैलास मुदलीयर, सलीम शेख,राकेश मुंडावरे, बाळा गीते, सुरेखा निमसे, शंकर मोकळ,मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, सचिन बिडकर. सिद्धार्थ गायकवाड.नदीम शेख,मीनाक्षी काकलीज, मधुकर मौले, मनोहर बोराडे.योगेश दिवे, नाना पवार, उदय सराफ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळी संदेश पाठवण्यासाठी किंवा अगदी आवश्यक कामांसाठीही प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा वापर केला जात होता. आज मात्र आपण सातासमुद्रापलीकडील व्यक्तीशीही सेकंदाचाही विलंब न करता संपर्क साधू शकतो. त्याला पाहू शकतो हे सोशल मीडियामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे आधुनिक जगतातील संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम अर्थातच सोशल मीडियाच आहे. आज प्रत्येक व्यक्ती दिवसभरात बराच वेळ हा सोशल मीडियाचा वापर करते. पण एक काळ असाही होता की आपल्याला सोशल मीडिया म्हणजे काय हेच माहीत नव्हते. आपले पूर्वज एकेकाळी संदेश, जलद दळणवळणासाठी उंट, घोडे यांचासुद्धा वापर होत असे. एक तो काळ होता आणि एक आजचा काळ आहे, जिथे आपण कित्येक गोष्टींसाठी पूर्णपणे सोशल मीडियावर अवलंबून आहोत. ही क्रांती फार कमी वेळात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, निवडणुकांमध्ये सोशल मीडिया हे अधिक प्रभावी माध्यम ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचा सोशल मीडिया केडर निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ही कार्यशाळा अतिशय महत्वाची आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता आहे. देशातील महापुरुष, पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्या विरोधात कुणी चुकीचा संदेश पसरवित असेल तर त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं गेलं पाहिजे. पक्षाची ध्येय धोरणे, विकासाची कामे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment