ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
आंबेगण :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ)- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथे १५ ऑगस्ट 'स्वातंत्र्य दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेचे ध्वजारोहण आंबेगण ग्रा.पं.सरपंच सुरेश राघो वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी उपसरपंच सोनाली लोखंडे व सर्व ग्रा.पं.सदस्य आंबेगण,शा.व्य.समिती अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, कविता वाघ व सर्व गावकरी उपस्थित होते.
आंबेगण गावातील पोलीस खात्यातील सेवानिवृत्त पोलिस भिमराव दगुजी गायकवाड यांचा आंबेगण ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 'हर घर तिरंगा' या उपक्रमातंर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांनी तिरंगा बॅच बनवले त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर जगदाळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जोरी, गोसावी, तुसे, भामरे, थोरात,श्री.हयाळीज, मोरे, कुवर, चौधरी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
Comments
Post a Comment