शिवसेना पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी १६ ऑगस्ट पासुन तालुका बैठकाचे आयोजन - गणेश कदम
नाशिक लोकसभा मतदार संघात गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या अभियानातर्गत १०१ भव्य शाखा उद्घाटन अभियान राबविणार - गणेश कदम सहसंपर्क प्रमुख नाशिक लोकसभा
मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली लोकसभा मतदार संघात शिवसेना पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली सहसंपर्क प्रमुख गणेश कदम,जिल्हाप्रमुख अनिल ढिकले यांनी तालुका प्रमुख तसेच पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले
राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते मा एकनाथ शिंदे साहेबाच्या नेत्रूत्वात राज्य सरकारने घेतलेले लोकाभिमुक निर्णयाची माहीती व कार्यसम्राट खा हेमंत गोडसे यांनी केलेली कामे जनते पर्यंत पोहचविण्यासाठी तसेच नाशिक लोकसभा मतदार संघात वंदनीय 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतुन गांव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या अभियानातर्गत घराघरात शिवसैनिक तयार करण्यासाठी १०१ भव्य शाखा उद्घाटन अभियान राबविण्यासाठी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर शिवसैनिकांची बैठक घेवून मेळाव्याचे आयोजन कण्यात येणार आहे. यासाठी तालुका प्रमुख तसेच पदाधिकारी यांनी कामाला लागावे असे अवाहन सहसंपर्क प्रमुख गणेश कदम,जिल्हा प्रमुख अनिल ढिकले यांनी केले
यावेळी ईगतपुरी तालुका प्रमुख संपतराव काळे ,नाशिक तालुका प्रमुख लकी ढोकणे,सिन्नर तालुकाप्रमुख योगेश म्हस्के व त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख रवी भोये ईगतपुरी संपर्क प्रमुख कुंडलीक जमधडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment