मखमलाबाद विद्यालयात क्रांती दिन व आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
मखमलाबाद (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे ९ ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते क्रांतीकारक भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर पर्यवेक्षिका माधुरी थेटे व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.कु.चंदना वाघेरे व कु.साक्षी चितारे हिने आदिवासी दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे.गरिबी,अज्ञान,आरोग्य,बेरोजगारी,मजुरी अशा अनेक समस्यांनी हा समाज ग्रासलेला आहे.त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी १९९४ पासुन ९ आॅगस्ट हा दिवस "जागतिक आदिवासी दिन" म्हणुन साजरा करण्याची घोषणा केली.तेंव्हापासुन संपूर्ण जगभरात हा दिवस "जागतिक आदिवासी दिन" म्हणुन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.आदिवासी या शब्दांमधील आदि म्हणजे खुप आधीपासुन आणि वासी म्हणजे वास्तव्य करणारे.खुप आधीपासुन,पूर्वीपासुन वास्तव्य करणारे लोक म्हणजेच आदिवासी होय.आदिवासी लोक निसर्गाची पुजा करतात.निसर्गातील प्रत्येक वस्तुला ते देवता मानतात.महाराष्ट्रामध्ये मल्हार कोळी,महादेव कोळी,कोकणा,वारली,कातकरी,ठाकुर,पावरा,गावित,
भिल्ल अशा अनेक आदिवासी जमाती ठाणे,पालघर,गडचिरोली,चंद्रपुर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.देशाच्या राष्ट्रपती या एक आदिवासी महिला आहेत ही आपल्या सर्वांसाठी एक गौरवाची गोष्ट आहे.आज हा समाज प्रगती करतांना आपल्याला दिसत आहे.कु.रुद्र भोर यांने क्रांतीदिनानिमीत्त आपले मनोगत व्यक्त केले.इंग्रजांच्या गुलामगिरीतुन देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपले प्राणांचे बलिदान दिले त्या सर्वांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस म्हणजे क्रांतीदिन होय.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांनी आदिवासी गित सादर केले.व पावरी नृत्यावर कु.चंदना वाघेरे व कु.साक्षी चितारे यांनी आदिवासी नृत्य सादर केले.तसेच कु.चंदना हिने वैयक्तिक पावरी नृत्य सादर केले.कु.साक्षी शेंडगे हिने सुत्रसंचलन केले.या सर्व विद्यार्थ्यांना ८ वी फ च्या वर्गशिक्षिका चैताली पिंगळे व सांस्कृतिक प्रमुख वैशाली देवरे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.ज्युनियर काॅलेज विभागात सुध्दा आदिवासी दिन साजरा करण्यात आला.काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी दिनाचे महत्व विशद केले व पारंपारिक वेशभुषेत आदिवासी नृत्यही सादर केले.सुत्रसंचलन जेष्ठ प्राध्यापक विकास थोरात यांनी केले.याप्रसंगी पर्यवेक्षिका माधुरी थेटे,ज्युनियर काॅलेज विभागप्रमुख उज्वला देशमुख,प्राध्यापक,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment