शिक्षक हे समाज व देश घडविणारे आधारस्तंभ - प्रा.सत्यम साहेबराव चव्हाण

देवळा :- कुंभार्डे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.शिक्षक हे समाज व देश घडविणारे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन कुंभार्डे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सत्यम साहेबराव चव्हाण यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.
जनता उच्च, व माध्यमिक, विद्यालय कुंभार्डे येथे डॉ, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस तथा शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा.सत्यम चव्हाण बोलत होते.ते पुढे म्हणाले शिक्षकाशिवाय ज्ञान प्रसाराचे काम होऊ शकतच नाही समाज घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात शिक्षकांच्या प्रती समाजात प्रचंड  आदर असतो. साधी राहणी व उच्च विचारसरणी यातून जसे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कार्य केले.भारताचे राष्ट्रपती असताना सुद्धा त्यांनी स्वतःत मधील शिक्षक जागृत ठेवला व माझा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे सांगितले त्याची दखल घेऊन सरकारच्या वतीने  5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो." कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य सत्यम चव्हाण, ठाकरे मॅडम, एम एस आहिरराव मॅडम, निकम, सरोदे, पाटील, मापारी, वाघ, हिरे, निकम, साळुंके व्ही बी आदींनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. 
सकाळ व दुपार दोन्ही सत्रांत इयत्ता 10 वी च्या विद्यार्थी शिक्षकांनी व इयत्ता 12 वी च्या विद्यार्थी शिक्षकांनी कॉलेज व 10 वी च्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कामकाज केले.
कार्यक्रमात" गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा" हे गीत श्रीमती हिरे व विद्यालयाच्या गीत मंचाने सादर केले. 
विद्यार्थी शिक्षकांच्या हस्ते सर्व गुरुजनांचा लेखणी व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. 
दुपार सत्रात कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी शिक्षकांनी केले." विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे बालपण, सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय कार्य याविषयी माहिती सांगितली. तसेच श्रीमती हिरे के आर. श्रीमती वाघ एस आर, सरोदे एस एन, यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्या विषयी माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन