मखमलाबाद विद्यालयात श्रींचे विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे विघ्नहर्ता श्री गणेशाचे विसर्जन माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे व सौ.छाया पिंगळे यांच्या शुभहस्ते विधीवत पुजा करुन मोठ्या उत्साहात करण्यात आले.जेष्ठ शिक्षिका योगिता कापडणीस यांनी श्रींची सत्यनारायण पुजा केली.संगीत शिक्षक तुकाराम तांबे व गीतमंचाने अतिशय सुरेल अशी आरती गायिली.जेष्ठ शिक्षिका संगीता मापारी यांनी सुरुची प्रसाद बनविला तसेच शालेय पोषण आहारातर्फे सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणुन गोड शिरा देण्यात आला.जेष्ठ शिक्षिका ज्योती काळोगे यांनी बनविलेल्या पर्यावरणपुरक गणेश मुर्तीच्या मिरवणुकीची तयारी करण्यात आली.यामध्ये शालेय गीतमंचाचा वाद्यवृंद,शालेय पंतप्रधान कु.अनुष्का गीते,सर्व मंत्रीमंडळातील प्रतिनिधी,सर्व वर्गांचे वर्ग प्रतिनिधी या सर्वांनी श्रींची वाद्यांच्या तालात शालेय क्रिडांगणावर मिरवणूक काढली.या मिरवणुकीदरम्यान प्राचार्य,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी,सर्व विद्यार्थी यांनी नाचगाण्यांचा मनसोक्त आनंद घेतला.या शिस्तप्रिय मिरवणुकीस जेष्ठ क्रीडाशिक्षक अनिल पगार,दिलीप सोनवणे,नितीन जाधव,एन.सी.सी.आॅफीसर भास्कर भोर व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.जेष्ठ शिक्षिका वर्षा पाटील व अश्विनी वडघुले यांनी आकर्षक पध्दतीने फुलांनी सजविलेल्या पिंपात प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते श्रींचे विसर्जन करण्यात आले.सर्व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कमिटी प्रमुख वैशाली देवरे,भाग्यशाली जाधव व त्यांच्या सर्व सहकार्यांनी अतिशय उत्कृष्ट पध्दतीने केले.कार्यक्रमास प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,जेष्ठ शिक्षिका विमल रायते,नितीन भामरे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment