मखमलाबाद विद्यालयात कर्मवीर गणपतदादा मोरे यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर गणपतदादा मोरे यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मविप्र संचालक रमेश पिंगळे यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर उच्च माध्यमिक स्कुल कमिटी अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे,वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,जेष्ठ सभासद विश्वनाथ पिंगळे,चंद्रभान पिंगळे,बाळासाहेब पिंगळे,राजेंद्र ढबले,शिवाजी हेंगडे,अजित ताडगे,प्राचार्य संजय डेर्ले,अनिल पगार,नितीन जाधव उपस्थित होते.कु.प्रांजल सोज्वळ व कु.स्वराली परदेशी यांनी कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.जेष्ठ शिक्षक शिवनाथ हुजरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,गणपतदादांचा जन्म निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे झाला असुन ते सत्यशोधक चळवळीच्या विचारसरणीचे कार्यकर्ते होते.बहुजन समाजाने शिक्षित व्हावे,यासाठी त्यांनी चळवळ उभी केली.संस्थेचे पहिले वसतीगृह नाशिकला वाईकर वाड्यात सुरु झाल्यावर स्थानिक परंपरावादी लोकांनी ते बंद पाडण्यासाठी स्वयंपाकी महिलांना पिटाळून लावले.वसतीगृह बंद पडून विद्यार्थ्यांची आबाळ होऊ नये म्हणुन त्यांनी पत्नी सारजाबाईंना स्वयंपाकाचे काम दिले.तेंव्हा कर्मवीर भाऊसाहेब हिरे,कर्मवीर काकासाहेब वाघ हे वसतीगृहात विद्यार्थी होते.गणपतदादांचा स्वतःचा जलशाचा फड होता.जलशांच्या माध्यमातून उदोजी मराठा वसतीगृहासाठी पैसा व धान्य ते जमा करीत.राजकारणापेक्षा शिक्षण व समाजकारणाची त्यांना अधिक आवड होती.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवर त्यांची नितांत श्रध्दा होती.त्यांना भेटण्यासाठी ते पिंपळगाव बसवंतहून धावत नाशिकला आले,पण शाहू महाराजांची भेट झाली नाही.हे शाहू महाराजांना कळल्यावर सन १९२० मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गणपतदादांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला.मविप्र संस्थेसाठी त्यांचे योगदान फार मोठे आहेत.त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणुन निफाडच्या महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहेत.दिनांक १९ सप्टेंबर १९५३ रोजी त्यांचे निधन झाले.कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना जेष्ठ शिक्षिका प्रमिला शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका वैशाली देवरे यांनी केले.कार्यक्रमास जेष्ठ शिक्षिका विमल रायते,नितीन भामरे,ज्युनियर काॅलेज प्रमुख सी.एन.देशमुख,प्राध्यापक,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment