गोदातरंग निबंध व वकृत्व स्पर्धा आश्रमशाळा आंबेगण येथे उत्साहात संपन्न
आंबेगण :- डांग सेवा मंडळ नाशिक व सदिच्छा ट्रस्ट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ' गोदातरंग ' निबंध व वकृत्व स्पर्धा ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण ता. दिंडोरी येथे आयोजित करण्यात आल्या.
डांग सेवा मंडळ या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या उंबरठाण, सुळे,वारे,कुकूडणे, शिंदे,धांद्रीपाडा, आंबेगण आश्रमशाळा व धोंडेगाव येथील आश्रमशाळा या शाळेतील ८६ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता ताई बिडकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सदिच्छा ट्रस्ट नाशिक येथील पुष्पाताई जोशी, अरुण जोशी, अनुपमा पाटील उपस्थित होते. या स्पर्धेत परिक्षक म्हणून योगेश गायकवाड, विवेक चित्ते,श्रध्दा कापडणे, सोनवणे, हेमंत कठापूरकर, प्रेरणा तवार, अनंत भालेराव लाभले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयावर उत्स्फूर्त वकृत्व सादर केले.तसेच निबंधातून सुंदर हस्ताक्षरात आपले विचार मांडले. सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचं कौतुक करण्यात आले तर सर्व स्पर्धेतून सांघिक फिरता करंडक मिळविण्यात ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण ही शाळा यशस्वी झाली. या कार्यक्रमासाठी आश्रमशाळा आंबेगण येथील प्राथ. मुख्याध्यापिका पाटील, माध्य. मुख्याध्यापक कुमावत अधिक्षक जोरी, अधिक्षिका चौधरी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षक गोसावी यांनी केले.
Comments
Post a Comment