नाशिक मनपाच्या वतीने शाडू माती, तसेच लाल मातीच्या श्री गणेश मुर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन

नाशिक: नाशिक महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने अभिनव संकल्पना नाशिक शहरांमध्ये राबवली जाणार आहे.
"गणेश मूर्ती आमची आणि किंमत तुमची" या मूर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन राजीव गांधी भवन येथे अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांचे हस्ते झाले.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने एक अभिनव संकल्पना नाशिक शहरांमध्ये राबवली जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून भाविकांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा वापर करावा या हेतूने ही संकल्पना राबवली जात आहे. संगमनेर येथील लिबर्टी अर्थवेअर आर्टचे वंदना व हेमंत जोर्वेकर या दांपत्याने या ठिकाणी शाडू माती व लाल मातीच्या मुर्त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. "गणेश मूर्ती आमची आणि किंमत तुमची" या संकल्पनेतून या मूर्ती नागरिकांना गणेश भक्तांना उपलब्ध होणार आहेत. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील मुख्य प्रवेशद्वार जवळील वाहनतळ येथे व सर्व विभागीय कार्यालयांत विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात या मूर्ती माफक दरात उपलब्ध रहाणार आहेत.

या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून स्टॉलवर-शाडू मातीच्या मूर्ती विक्रीची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पर्यावरण विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, कर उपायुक्त श्रीकांत पवार, शहर अभियंता नितीन वंजारी,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.कल्पना कुटे, माजी विभागीय अधिकारी दिलीप मेनकर आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश कमोद यांनी केले.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे उभारण्यात आलेल्या पर्यावरण पूरक मुर्त्यांच्या स्टॉलवर अधिकारी कर्मचारी यांनी गर्दी केली होती. तसेच अनेक अधिकारी,कर्मचाऱ्यांनी या संकल्पनेच्या माध्यमातून श्री गणेशाच्या मुर्त्या विकत घेतल्या.
नाशिक महानगरपालिका गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि मंडळाच्या पदाधिकारी यांनी या स्टॉल वरून पहिली मूर्ती खरेदी केली आणि सर्व नाशिककरांनी पर्यावरण पूरक मूर्ती खरेदी करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन