मेंढपाळ बांधवांच्या समस्या प्रश्नी पालकमंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन - समाधान बागल प्रहार नाशिक जिल्हा चिटणीस
नाशिक :- देवळा तालुक्यातील मेंढपाळ बांधवांना चारापाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे,जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना निवेदन. बिर्हाड आंदोलन चा इशारा
देवळा तालुक्यातील मेंढपाळांच्या प्रश्ना संदर्भात देवळा तालुक्यातील मेंढपाळ बांधवांनी नाशिक वनविभाग, जिल्हाधिकारी नाशिक विभागीय आयुक्त नाशिक यांना निवेदन देण्यात आले तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना मेंढपाळांच्या चारापाणी प्रश्नी निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले, जिल्हाधिकारी यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्णय घेण्यात येईल तालुकास्तरावर या विषय मार्गी लावण्यासाठी त्या त्या विभागाला आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले. एफडीओ वनपरिक्षेत्र यांनाही निवेदन देण्यात आले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, यांनाही या चारापाणी प्रश्नी भेट घेत निवेदन देण्यात आले.चार ते पाच दिवसात निर्णय नाही झाल्यास 30/35 कळपांसहित देवळा तहसील कार्यालया वरती बिऱ्हाड आंदोलन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार चे जिल्हा चिटणीस समाधान बागल यांनी दिला आहे. लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर प्रहार स्टाईलने आंदोलन उभे करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.यावेळी प्रहारचे जिल्हा चिटणीस समाधान बागल,नाशिक शहर प्रमुख श्याम गोसावी,डॉ कल्पेश शिंदे, विजय बागल, ज्ञानेश्वर व्हा व्हलगडे, आदींसह मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment