प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन
नाशिक - संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान दिव्यांगांसह निराधारांना 3 महिने उलटून ही न मिळाल्याने प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.शारीरिक आव्हाने असलेले दिव्यांग आर्थिक दुर्बल घटक असल्याने त्यांचा उदरनिर्वाह या अनुदानावरच अवलंबून असल्याने याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.प्रसंगी जिल्हाध्यक्ष ललित पवार, कार्याध्यक्ष बबलु मिर्झा उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी, शहराध्यक्ष बच्चू निकाळजे, उपजिल्हा प्रमुख दत्ता कांगणे, शहर सचिव पंकज सुर्यवंशी उपशहराध्यक्ष बापु जाधव,सरचिटणीस लक्ष्मण पवार उपस्थित होते.
Comments
Post a Comment