मखमलाबाद विद्यालयातील कु.अस्मिता खैरनारचा ज्युडो स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथील कु.अस्मिता नरेंद्र खैरनार हिने यशवंत व्यायाम शाळा,नाशिक येथे झालेल्या शासकीय क्रीडा स्पर्धेत ज्युडो या प्रकारात मुलींच्या १७ वयोगटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.कु.अस्मिता हीची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.या यशस्वी विद्यार्थिनीस क्रीडाशिक्षक अनिल पगार,दिलीप सोनवणे,नितीन जाधव यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कु.अस्मिता खैरनार हीचे प्राचार्य संजय डेर्ले यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment