नाशिक महानगरपालिकेत अभियंता दिन साजरा,आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांचे सर विश्वेश्वरय्या यांना अभिवादन
नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा करण्यात आला. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे पुढील वर्षभरात जे अभियंते सेवानिवृत्त होणार आहेत त्यांनी केलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या सेवेतील विशिष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर,अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीचे औचित्य साधून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासाच्या दृष्टीने अभियंत्यांनी त्यांची प्रेरणा घेऊन विविध विकास कामांमध्ये आपले योगदान दिलेले असल्यामुळे त्यांचा यथोचित गौरव नेहमीच केला जाईल अशी खात्री नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी दिली. तर अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध विकास कामांमध्ये अभियंते विविध प्रकारची कामे करीत असून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नागरिकांच्या मुलभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने अभियंते विशेष जबाबदारी पार पाडत असल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले. यावेळी या कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे,श्रीकांत पवार, प्रशांत पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेखा जाधव, मुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे,संदेश शिंदे, राजेंद्र शिंदे, गणेश मैड, नितीन पाटील, रविंद्र धारणकर, प्रकाश निकम, बाजीराव माळी, अविनाश धनाईत, यांसह नाशिक महानगरपालिकेचे विविध विभागातील उपअभियंते, सहा. अभियंते, शाखा अभियंते, कनिष्ठ अभियंते, इतर अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी अभियंत्यांचा विशेष सत्कार केल्यामुळे सर्व अभियंत्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदेश शिंदे व समीर रकटे यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी तर आभार प्रदर्शन व सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.
Comments
Post a Comment