मखमलाबाद विद्यालयात जागतिक साक्षरता दिन मोठ्या उत्साहात साजरा
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे जागतिक साक्षरता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर जेष्ठ शिक्षिका विमल रायते,अनिल पगार,अनिल शेवाळे,संतोष उशीर,नितीन जाधव,तुकाराम तांबे,वर्षा पाटील,सुनिता घोटेकर,सारिका पांगारकर,योगिता रोडे,चैताली मोगल,सोनल घडवजे व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.कु.तनुजा वाघेरे हिने जागतिक साक्षरता दिनाचे महत्व सांगितले.युनेस्कोने ८ सप्टेंबर १९६६ पासुन हा दिवस "जागतिक साक्षरता दिवस" म्हणुन साजरा करण्याचे ठरविले आहेत.आंतरराष्ट्रीय सहकार्यातुन शिक्षण,विज्ञान व सांस्कृतिक विकास आणि त्यातुन शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी युनेस्कोने साक्षरतेचे महत्व लक्षात घेऊन हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.प्राचार्य संजय डेर्ले यांनी साक्षरता दिन साजरा करण्याचे महत्व पटवून दिले.आपल्या जीवनात शिक्षणाचे किती आणि काय महत्व आहे याचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे,तर मानवी प्रगतीसाठी तसेच गरीबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तिशाली मार्ग आहे.जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलविण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.साक्षरतेने विद्यार्थी स्वतःचे आणि पर्यायाने देशाचे भवितव्य उज्वल करतो.कु.श्रध्दा ठोंबरे हिने साक्षरतेवर आधारीत कविता सादर केली.सुत्रसंचलन कु.आदीती नागरे व आभार प्रदर्शन कु.सार्थक शिंदे याने केले.या सर्व इयत्ता ९ वी फ च्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सुनिता घोटेकर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment