नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे भगवे वादळ येणार - भाऊसाहेब चौधरी शिवसेना सचिव


देवळाली :- देवळाली विधानसभा मतदार संघांतील ६६ शाखाप्रमुख यांना शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप

२० सप्टेंबर पासुन देवळाली मतदार संघात गांव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक मोहीमेअंतर्गत १०१ शाखांचे भव्य उद्धघाटन सोहळ्याला होणार प्रारंभ, नाशिक शिवसेना कार्यालयामध्ये देवळाली मतदारसंघातील शाखाप्रमुखकांची बैठक संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी,नाशिक लोकसभेचे कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे,सहसंपर्कप्रमुख गणेश कदम,राजू अण्णा लवटे,काशिनाथ मेंगाळ,जिल्हाप्रमुख अनिल ढिकले,अजय बोरस्ते,जिल्हा संघटक योगेश म्हस्के, महानगर प्रमुख प्रविन तिदमे आदी होते.
नाशिक लोकसभा ग्रामीणच्या पहिल्याच बैठकीला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे शिवसेना कार्यालय गर्दीने गेले व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत नाशिक तालुकाप्रमुख लकी ढोकणे यांनी केले, लकी ढोकणे यांची नाशिक तालुकाप्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर देवळाली मतदारसंघात १०१ शाखांचे भव्य उदघाटन सोहळ्याची तयारी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, जिल्हा संघटक योगेश म्हस्के,जिल्हाप्रमुख अनिल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

शिवसेना पक्षाची पहिल्या शाखेचे उदघाटन देवळाली कॅम्प खासदार हेमंत गोडसे यांच्या शुभहस्ते शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थित होणार असल्याची माहीती नाशिक तालुका प्रमुख लकी ढोकणे यांनी दिली

या बैठकीला ईगतपुरी तालुका प्रमुख संपत काळे, त्रंबकेश्वर तालुका प्रमुख रवी भोये,सिन्नर तालुका प्रमुख योगेश म्हस्के,युवा सेना विस्तार अधिकारी योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख सदानंद नवले,अंबादास जाधव, तुषार भोसले,यश बच्छाव,आकाश आहेर यासह  नाशिक लोकसभा मतदार संघांतील महिला आघाडी,युवती सेना,विध्यार्थी सेना पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन