राष्ट्रवादी युवककडून पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नाशिक दि.१९ सप्टेंबर :- आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याच्या विरोधात नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करत पडळकरांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केले.
आमदार पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला आहे. नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयाच्या बाहेर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. तसेच पडळकरांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी युवक शहर अध्यक्ष अंबादास खैरे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ,चेतन कासव,कार्याध्यक्ष आदित्य गव्हाणे,किरण चौधरी,ज्ञानेश्वर महाले, गणेश हांडोरे,संतोष अढांगळे,संदीप गांगुर्डे,अशोक पाटील,गणेश पवार,पराग गांगुर्डे,राजेश हाडपे,समाधान महाले,राज रांधवा,विकी वाकळे, गणेश पवार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment