मेंढपाळ बांधवांच्या समस्या प्रकरणी प्रहारच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन
देवळा :- तालुक्यातील मेंढपाळ बांधवांच्या प्रश्नांच्या संदर्भात तहसील कार्यालय येथे प्रांत अधिकारी यांची भेट घेत निवेदन देण्यात आले.गेल्या आठ दिवसापासून मेंढपाळ हे त्यांचा मेंढ्यांना चारा पाणी उदरनिर्वाह करण्यासाठी अधिकाऱ्यांना भेटत,निवेदन देत मागणी करीत आहेत चालू वर्षी कमी प्रजन्यमान झाल्यामुळे मेंढपाळ बांधवांना मेंढ्यांच्या चारा पाण्याची चिंता सतावत आहे आपले कळप घेऊन जाण्यासाठी कुठेही जागा नाही तसेच वनविभागाच्या क्षेत्रात वनअधिकारी मेंढपाळांना परवानगी देत नाही.उदरनिर्वाह करण्यासाठी मेंढया जगवणार कशे त्यानिमित्ताने आज प्रांत कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती तसेच प्रांत अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले परंतु कुठलाही ठोस निर्णय होत नसल्याकारणाने मेंढपाळांवर आज उपासमारीची वेळ आली आहेत.यावेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, जिल्हा चिटणीस समाधान बागल,यांनी मेंढपाळांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले आणि अधिकारी कडे मेंढपाळांच्या समस्येप्रश्नी पाठपुरावा केला आहे. दोन ते चार दिवसात या मेंढपाळांचे,प्रश्न मार्गी लावा नाही तर तहसील कार्यालय मेंढ्यांची कळप घेऊन, बिर्हाड आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असे याप्रसंगी गणेश निबाळकर यांनी सांगितले.यावेळी संदीप महाराज जाधव, डॉ कल्पेश शिंदे,पपू व्हलगडे, मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment