Posts

Image
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ( प्रतिनिधी पेठ ) दिनांक ३०/०८/२०१९ नायाब तहसिलदार पेठ तहसिल  बाळासाहेब भाऊराव नवले याने वडलोपार्जित शेत जमिनीचे हिस्से वाटपाचे प्रकरण निकाली काढण्याकरीता सहा हजार रुपये लाचेची मागणी केली असता शेतकरी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक संपर्क साधत सदर घटनेची माहीती दिली असता लाचलुचपत विभाग नाशिक यांच्या पथकाने कारवाई करत लाचखोर नायाब तहसिलदार बाळासाहेब भाऊराव नवले   पेठ तहसिल कार्यालय नाशिक याला कार्यालयात लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले पेठ पोलिस ठाण्यात गुण्हा दाखल करण्यात आला.

साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) राज्याच्या वन विभागाला 3 हजार 844 कोटींचा कॅम्पा निधी नवी दिल्ली, दि.29/08/2019 व्यावसायिक सामाजिक दायित्व (सीएसआर) कायद्यात सुधारणा करून एकूण उपलब्ध निधीच्या 0.25 टक्के निधी वनक्षेत्र विकासासाठी वापरणे अनिवार्य करण्यात यावे, अशी सूचना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज  येथे आयोजित राज्यांच्या वनमंत्र्याच्या परिषदेत केली. या बैठकीत केंद्रीय वने-पर्यावरण व हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या वाट्याचा ‘वनीकरण भरपाई निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणातील’ (कँपा) 3 हजार 844 कोटी रुपयांचा धनादेशही मुनगंटीवार यांनी स्वीकारला. इंदिरा पर्यावरण भवन येथे आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व राज्यांच्या वनमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रालयाचे राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध राज्यांचे वनमंत्री या बैठकीस उपस्थित होते.  राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेही यावेळी उपस्थित हो...

साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख नाशिक जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान

Image
प्रतिनिधी नाशिक 03/08/2019 सर्व नदीकाठच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की खालील प्रमाणे धरणातून विसर्ग सुरू आहे...5 वाजता.. गंगापूर 17748 क्यूसेस गौतमी गोदावरी 6225 क्यूसेस आनंदी 687 क्यूसेस दारणा 23192 क्यूसेस भावली 1509 क्यूसेस वालदेवी 502 क्यूसेस नांदूर मधमेश्वर 83773 क्यूसेस पालखेड 6068 क्यूसेस चनकापूर 7307 क्यूसेस पुनद 2895 क्यूसेस हरणबरी 56 क्यूसेस होळकर पूल 20375 क्यूसेस ( धोका पातळी) वरील प्रमाणे विसर्ग सुरू आहे सर्व नागरिकांनी सतर्क रहावे व परिसरात पुराचे पाणी शिरत असल्यास तात्काळ स्थलांतरित व्हावे व नदीकाठी , पुलावर गर्दी करू नये तसेच पूर बघण्यासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. सूरज मांढरे भाप्रसे जिल्हाधिकारी नाशिक

मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेतल्या शिवाय आम्ही मुख्यमंत्री यांचा सत्कार करणार नाही .गणेश कदम

Image
मराठा युवकांवरील गुन्हे माघारी घेतल्याशिवाय मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणे चुकीचे असल्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार नाही गणेश कदम मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या 50 मराठा युवकांच्या बलिदानावर,७ ते ८ हजार युवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांच्या त्यागावर, लाखोच्या मोर्चाने सहभाग नोंदवून रस्त्यावर उतरणारा माझा समाज बांधव आणि भगिनी यांच्या संघर्षावर मिळालेले हे आरक्षण, न्यायव्यवस्थेच्या सूचने प्रमाणे मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून आयोगाने दिलेली शिफारस न्यायव्यवस्थेने स्वीकारली,व भारतीय राज्यघटने प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण लागू केले आहे. म्हणून खऱ्या अर्थाने सत्कार करायचा असेल तर बलिदान देणाऱ्या युवकांच्या माता पिता व पत्नी मुलाबाळांचा सत्कार झाला पाहिजे,७ ते ८ हजार युवकांनी जेलमध्ये बसून संघर्ष केला त्यांचा सत्कार झाला पाहिजे, रस्त्यावर उतरून आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झालेल्या माझ्या माता भगिनींचा सत्कार झाला पाहिजे, कै. आण्णासाहेब पाटील ते पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचारांचा झाला पाहिजे तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र ...

जिल्हा आरोग्य आधिकारी डेकाटे यांच्या वर गुन्हा दाखल साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख

Image
नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ विजय डेकाटे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या अंंतर्गत गुन्हा दाखल (प्रतिनिधी नाशिक) २०१८ पासुन ची वेतनवाढ मंजुरीसाठी २०००० रुपयांची मागणी डॉ डेकाटे यांनी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी कारवाई करत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख

Image

साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख

Image
                          शिवरायांची बदनामी करणाऱ्या फडणीस बाईवर तात्काळ कारवाई ची छत्रपती युवा सेनेची मागणी (प्रतिनिधी जळगाव) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वैभवी फडणीस या महिलेने पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या बरोबर करुन अकलेचे तारे तोडले आहेत यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना झाली असुन या कृत्यामुळे शिवप्रेमी मध्ये प्रचंड संताप आहे.  दंगल भडकविण्याचे काम या महिलेने केले आहे. महाराजांच्या प्रतिमेला धक्का लावणारया या महिलेवर तात्काळ गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा छत्रपती युवा सेने तर्फे आदोलन छेडण्यात येइल छत्रपती युवा सेना कदापि महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही असा इशारा संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ पाटील  जिल्हा उपाध्यक्ष विकास निकम यांनी दिला, यावेळी विकास निकम, स्वप्नील पाटील, दिपक पटील ,भावेश पाटील ,धर्मदास पाटील, महेश मराठे आदी सहा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्ते उपस्थित होते.