मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेतल्या शिवाय आम्ही मुख्यमंत्री यांचा सत्कार करणार नाही .गणेश कदम

मराठा युवकांवरील गुन्हे माघारी घेतल्याशिवाय मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणे चुकीचे असल्यामुळे

आम्ही मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार नाही
गणेश कदम

मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या 50 मराठा युवकांच्या बलिदानावर,७ ते ८ हजार युवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांच्या त्यागावर, लाखोच्या मोर्चाने सहभाग नोंदवून रस्त्यावर उतरणारा माझा समाज बांधव आणि भगिनी यांच्या संघर्षावर मिळालेले हे आरक्षण, न्यायव्यवस्थेच्या सूचने प्रमाणे मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून आयोगाने दिलेली शिफारस न्यायव्यवस्थेने स्वीकारली,व भारतीय राज्यघटने प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण लागू केले आहे.
म्हणून खऱ्या अर्थाने सत्कार करायचा असेल तर बलिदान देणाऱ्या युवकांच्या माता पिता व पत्नी मुलाबाळांचा सत्कार झाला पाहिजे,७ ते ८ हजार युवकांनी जेलमध्ये बसून संघर्ष केला त्यांचा सत्कार झाला पाहिजे, रस्त्यावर उतरून आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झालेल्या माझ्या माता भगिनींचा सत्कार झाला पाहिजे, कै. आण्णासाहेब पाटील ते पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचारांचा झाला पाहिजे तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील सत्कार आम्ही जरूर करू त्याआधी ७ ते ८ हजार युवकावरील गुन्हे माघारी घ्यावेत, ज्या मराठा युवकांनी दिलेले बलिदान त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी मध्ये स्थान देणे व त्यांचा सन्मान राखण्याची भूमिका सरकारने पार पाडली पाहिजे तर आणि तरच तुमचा सत्कार
जय जिजाऊ...
एक मराठा..
लाख मराठा... गणेश भाऊ कदम
          संस्थापक अध्यक्ष
छत्रपती युवा सेना महाराष्ट्र राज्य

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन