त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या २८ एकर जागेवर कंपाऊंट कामांचे भूमिपूजन
त्रंबकेश्वर :- त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या गट नंबर १३ व १४,त्र्यंबकेश्वर या २८ एकर जागेला कंपाऊंड करण्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नितीन जीवने,देवस्थान विश्वस्त पुरुषोत्तम कडलग सहकारी मनोज थेटे,सर्व सहकारी विश्वस्थ तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सदर जागेमध्ये लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प सर्व सहकारी विश्वस्थ सचिव सौ. श्रींया देवचक्के विश्वस्त कैलास घुले, सत्यप्रिय शुक्ल, रूपाली भूतडा, स्वप्नील शेलार,यांनी केला आहे.