Posts

रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रीय हरित सेनेचा अनोखा उपक्रम ‘खऱ्या रक्षकांना राखी’

Image
नाशिक :- रक्षाबंधन या पवित्र सणाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद विद्यालय, पंचवटी येथील राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब) च्या विद्यार्थिनींनी एक आगळीवेगळी सामाजिक आणि पर्यावरणपूरक भूमिका बजावत, पंचवटी पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधवांना स्वतः हाताने तयार केलेल्या "टाकाऊतून टिकाऊ" राख्या बांधून त्यांचा सन्मान केला. विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधताना "आपण आमचे खरे रक्षक आहात" असा आदरभाव व्यक्त केला. उपस्थित पोलीस बांधवांनी विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत म्हणाले, रक्षाबंधन हे एकमेकांच्या रक्षणाचे वचन असते. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. कोणतीही अडचण आली, तर आमच्याशी कधीही संपर्क करा – आम्ही तत्पर आहोत. या प्रेरणादायी उपक्रम प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक कौतुक केले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव, सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार मुश्रीफ शेख, पोलीस हवालदार अनिल गुंबाडे, शरद ठाकरे, तसेच पोलीस कर्मचारी अस्तिक गायकवाड, राजेश महाले, श्रीकांत साळवे, चितळकर, रोहिणी उगले, रोहिणी सवं...

राज्यातील आरोग्य प्रयोगशाळा व रुग्णवाहिका सेवांचा सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

Image
मुंबई, दि. ७ : आरोग्य भवन येथे राज्यातील आरोग्य प्रयोगशाळा, १०२ रुग्णवाहिका सेवा व आरोग्य विभागाच्या परिवहन सेवेचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला. बैठकीत जलजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील आरोग्य संस्थांच्या परिसरातील जलस्रोतांचे पाणी शुद्ध व सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी ग्रामपंचायतींना ‘रेड कार्ड’ व ‘ग्रीन कार्ड’ देऊन जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आयपीएचएस (IPHS)मानकांनुसार सुसज्ज असाव्यात, आधुनिक उपकरणे व प्रशिक्षित कर्मचारी असावेत आणि परिसर स्वच्छ असावा, यावर भर देण्यात आला. मंत्री  आबिटकर यांनी खासगी रुग्णालयातील रुग्णांनी देखील सरकारी प्रयोगशाळेत तपासण्या कराव्यात, यासाठी प्रयोगशाळांचा दर्जा उंचावण्याचे निर्देश दिले. यामुळे शासनाला अतिरिक्त निधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. १०२ टोल फ्री रुग्णवाहिका सेवेसंदर्भात मंत्री बाबिटकर यांनी सूचना देताना सांगितले की, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वापरात असलेल्या रुग्णवाहिका केवळ महिला व बालकांसाठी न वापरता, आपत...

दृष्टिहीन मुली, आदिवासी विद्यार्थिनी, बचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन

Image
मुंबई, दि.७ :- दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राखी बांधली व ओवाळले. विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर, भालिवली, जिल्हा पालघर येथून आलेल्या आदिवासी महिलांनाही राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली राखी बांधली. रक्षाबंधनानिमित्त विविध संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थिनी, भगिनी व बांधवांनी गुरुवारी (दि. ७) राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली व ओवाळले. यावेळी राज्यपालांनी सर्वांच्या राखीचा विनम्रपणे स्वीकार करीत सर्वांची विचारपूस केली व भेटवस्तू दिल्या. राज्यपालांची भेट घेतलेल्या संस्थांमध्ये सिंधुताई सपकाळ यांनी सुरु केलेले ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनी, मुंबई मनपा अंतर्गत विविध महिला बचत गटांच्या सदस्य, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर,जिल्हा ठाणे येथील विद्यार्थिनी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण (जिल्हा रायगड...

सकल मराठा परीवार तर्फे"एक राखी सैनिकांसाठी" उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा

Image
नाशिक :- सकल मराठा परिवार नाशिक यांच्या वतीने मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद, , जनता विद्यालय गांधीनगर, मनपा शाळा ४९ पंचक, जनता विद्यालय पंचक या ठिकाणीं "एक राखी सैनिकांसाठी" हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा उपक्रमात सकल मराठा परिवार मागील चार वर्षापासून राबवत आहे . परिवाराच्या वतीने पाठवलेल्या राखी भेटल्यानंतर बटालियन कडून आभार पत्र येते व यात अनेक सैनिक बांधव आपल्या भावना व्यक्त करतात यावेळी समन्वयक खंडू आहेर,यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली.आपण सैनिकांपर्यंत पोहचू शकत नाही.जे सैनिक देशाचे रक्षण करतात अशा सैनिकांना आपण राखी व भेटकार्ड पाठविल्यामुळे त्यांचा आनंद द्वीगुणीत होणार आहे.तसेच जे बांधव दिवसरात्र सीमेवर सेवा करत आपल्या साठी उभे असता त्यांच्यामुळे आपले सण ,उत्सव जोराने साजरे होतात पण त्यांना त्यात सहभागी होता येत नाही तर आपल्या समाजचे त्यांच्या प्रती काही देणे लागते म्हणून सकल मराठा महिला परिवरच्या वतीने दरवर्षी हा रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवला जातो .यावेळी 20 ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात राखी,ग्रिटिंग व मे...

विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

Image
बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..! मुंबई, दि. २८ :- महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरून ग्रॅण्ड मास्टर दिव्या देशमुख यांनी भारताची मान गौरवाने उंचावली आहे. विशेषतः महाराष्ट्राची पहिली ग्रॅण्ड मास्टर.. विश्वविजेती म्हणून महाराष्ट्राचे नाव बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरही सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे. या कामगिरीसाठी तमाम महाराष्ट्राच्यावतीने दिव्या देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुख यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी उपविजेत्या ग्रॅण्ड मास्टर कोनेरू हम्पी यांचेही अभिनंदन केले आहे.बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरील या दोन्ही भारतीय खेळाडूंच्या चालींकडे अवघ्या बुद्धिबळ जगताची नजर खिळली होती, हा देखील भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी अपूर्व आणि अभिमानास्पद योग असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.मुख्यमंत्री फडणवीस शुभेच्छा संदेशात म्हणतात, महिला विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्याच प्रयत्नात दिव्या यांनी भारतीय विक्रम नोंदवला आहे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा सन्मान

Image
राज्यस्तरीय संपूर्णता अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा सन्मान नांदेड,३ ऑगस्ट:- नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल आयआयएम, नागपूर येथे राज्यस्तरीय संपूर्णता अभियान सन्मान समारोह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आणि आकांक्षित किनवट तालुक्याचे समन्व्यक पांडुरंग मामीडवार यांची उपस्थिती होती.

बालगृहातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Image
मुंबई, दि. १४ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालगृहात घडलेल्या अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांमध्ये अतिदक्षता बाळगून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्याच्या दृष्टीने शासन कार्यरत असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, प्रज्ञा सातव, आयुक्त नयना गुंडे, सहायुक्त राहुल मोरे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रभावी धोरण तयार करणे आवश्यक आहे. मुलींचा शैक्षणिक दर्जा, कौशल्यविकास आणि जीवनमूल्ये वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. बालगृहास प्रत्यक्ष भेटी देऊन तसेच लोकप्रतिनिधी आणि विभागामध्ये चर्चा करून यासंदर्भात कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. बालगृहातील मुलींच्या समस्या समजून घेण्यासाठी व...