सिटीलिंक बसमधून अतिरिक्त व्यावसायिक सामान नेल्यास होणार तिकीट आकारणी, १ नोव्हेंबर पासून होणार अंमलबजावणी
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. च्या माध्यमातून सद्यस्थितीत २४४ बसेसच्या माध्यमातून एकूण ५६ मार्गावर बससुविधा पुरविण्यात येते. यामध्ये नाशिक शहराबरोबरच नाशिक शहरापासून २० कि.मी च्या आत येणार्या सिन्नर, पिंपळगाव, दिंडोरी, मोहाडी, सुकेणा, सैयद्द पिप्री, त्र्यंबकेश्वर, गिरणारे, सायखेडा अशा ग्रामीण भागाकरिता देखील बससेवा पुरविण्यात येते. या ग्रामीण भागातून शहराकडे अनेक प्रवासी व्यवसायानिमित्त येतात. सोबत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक सामान ( लगेज ) असते. त्यामुळे आता अशा व्यावसायिक सामानावर तिकीट आकारणी करण्याचा निर्णय सिटीलिंकच्यावतीने घेण्यात आला आहे, प्रवासी सामान ( लगेज ) चे तिकीट दर आकारणी करणेबाबत नियमावली खालील प्रमाणे :- १) प्रवाशास शहर बसने प्रवास करतांना प्रवासासाठी आवश्यक असलेले *प्रवाशी सामान* प्रती प्रवाशी १० किलो पर्यन्त नेण्यास मोफत सवलत राहील. त्यापुढील प्रत्येकी १० किलो ग्रॅम ला त्या प्रवासाचे पूर्ण तिकीटाची आकारणी करण्यात येईल. उदा. ०-१० किलो –पूर्णतः मोफत, ११-२० किलोकरीता एक प्रवासी भाडे, २१-३० किलोकरीता दोन प्रवाश्यांचे भाडे ...