Posts

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्वखर्चाने होणार संपूर्ण येवला शहराची नालेसफाई स्वच्छता

Image
प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते ‘स्वच्छ येवला सुंदर येवला’ मोहिमेस सुरवात येवला,दि.३० जून :- येवला शहरात गेल्या वर्षी पावसळ्यात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतील ‘स्वच्छ येवला सुंदर येवला’ निर्माण करण्यासाठी संपूर्ण येवला शहरात स्व खर्चातून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी उपमुख्याधिकारी रोहित पगार, पालिकेचे स्वच्छता निरिक्षक सागर झावरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, माजी नगसेवक प्रवीण बनकर, सचिन शिंदे, राजेश भांडगे, निसार शेख, सुनील काबरा, संजय परदेशी, मलिक शेख, राजाभाऊ लोणारी, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान, निर्मला थोरात, सीमा गायकवाड, विमल शहा, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, दिपक खोकले, सुभाष गांगुर्डे, भूषण लाघवे, विकी बिवाल, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, सुमित थ...

मखमलाबाद विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त भव्य-दिव्य दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

Image
मखमलाबाद (प्रतिनिधी समाधान शिरसाठ ) — मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे आषाढी एकादशीनिमित्त विठूराय माऊलींची भव्य-दिव्य दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रास्ताविक जेष्ठ शिक्षिका योगीता कासार यांनी केले.त्यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगितले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मविप्र संचालक रमेश पिंगळे हे उपस्थित होते.त्यांनी आपल्या शुभहस्ते पालखी व विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला.याप्रसंगी प्राचार्य संजय डेर्ले,शिक्षकवृंद उपस्थित होते. संगीत शिक्षक तुकाराम तांबे व गीतमंच यांनी विठ्ठलाची सुरेल आरती,अभंग सादर केले.प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शालेय परिवाराला आषाढी एकादशीनिमित्त हार्दीक शुभेच्छा दिल्या.शालेय परिसर व मखमलाबाद गावातून अतिशय सुंदर पध्दतीने भव्य-दिव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या दिंडीमध्ये कु.प्रज्योत अमोल सोनवणे व कु.काजल प्रविण बोरसे यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभुषा साकारलेली होती.दिंडीत टाळ मृदुंगाच्या तालात सर्व विद्...

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हाच आमचा दृष्टिकोन अध्यक्षा हेमलता बिडकर

Image
आंबेगण :-  डांग सेवा मंडळ नाशिक संचलित ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आंबेगण या शाळेत अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा हेमलता ताई बिडकर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपाध्यक्ष दामोदर ठाकरे, संचालक प्रभाकर पवार,अ.प्र.देशपांडे, चंद्रात्रे सर, अनिल पंडित, भाऊसाहेब, लेखापाल पारिख साहेब, राजेंद्र म्हसदे आदी उपस्थित होते. हेमलता ताई बिडकर यांनी विद्यार्थी व शिक्षक यांनी चांगल्या प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आलेल्या साहित्याचा वापर करून संस्थेचे व शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करावा, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने दिलेल्या अटल टिंकरिंग लॅब सुरू केल्या आहेत. याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष दामोदर ठाकरे व संचालक पदाधिकारी यांनी अटल लॅबची पाहणी करून सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.तसेच अटल लॅबचे जिल्हा समन्वयक श्री. आढाव व सहकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. मुख्य...

मखमलाबाद विद्यालयात जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Image
मखमलाबाद  : मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे "जागतिक ऑलिम्पिक दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडु अंबादास तांबे हे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपिठावर प्राचार्य संजय डेर्ले,अभिनवचे मुख्याध्यापक सी बी पवार,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,जेष्ठ क्रिडाशिक्षक दिलीप सोनवणे,नितीन जाधव,नितीन भामरे,ज्युनियर काॅलेज क्रिडाप्रमुख डेर्ले सर आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कु.अश्विनी रामदास तुंबडे,इ.9 वी ड या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते क्रिडाज्योत पेटवून क्रिडांगणावर धावपट्टुंनी फेरी मारली.अंबादास तांबे यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी खेळांमध्ये भाग घेतला पाहिजे.तसेच आपल्या जीवनात खेळाचे किती महत्व आहे हे पटवून दिले.आॅलिम्पिक विषयी हॅन्डबॉल खेळाडू कु.चंदना वाघेरे हिने सविस्तर माहीती सांगितली.सुत्रसंचालन क्रिडाशि...

जलसंपदा सरळ सेवा भरती परिक्षेत यश मिळवत ज्युनिअर इंजिनिअर या पदावर निवड झाल्याने धांद्री ग्रामस्थांच्या वतीने क्रांती चव्हाण यांचा नागरी सत्कार

Image
सटाणा : धांद्री गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगी क्रांती संजय चव्हाण, झाली इंजिनिअर बागलाण तालुक्यातील धांद्री येथील शेतकरी कै केदा रघुनाथ चव्हाण यांची नात कुमारी क्रांती संजय चव्हाण जलसंपदा सरळ सेवा भरती परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादित करुण ज्युनिअर इंजिनिअर या पदावर  निवड झाली आहे. सन 2022 मध्ये क्रांतीने मुंबई येथे परीक्षा दिली होती. या परीक्षेत क्रांती चव्हाण यांनी यश संपादन करुन गावातील शेतकरी कुटुंबातील क्रांती चव्हाण यांनी शासकिय पदावर इंजिनिअर होण्याचा बहुमान मिळविला आहेे. कागदपत्रे पडताळणी झाली असुन लवकरच पदावर त्या रुजू होणार आहे.हि बातमी गावात समजताच गावकर्याच्या वतीने भव्य स्वागत करुण क्रांती चव्हाण यांंचा, स्वागत करुन सन्मान करण्यात आला.

निफाडला राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

Image
रक्तदान शिबिरासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन  जिल्हाभरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती निफाड :- निफाडला हिंदू धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा होळकर राजघराणे वंशज नानासाहेब होळकर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी महापुरुषांना अभिवादन करून रक्तदान शिबीराच्या माध्यमातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच जन्मोत्सव सोहळ्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.सर्व जाती धर्मातील जनतेने एकत्र येऊन सदर सोहळ्याचे नियोजन केले होते.याप्रसंगी कर्नाटकजवळील जत येथून धनगरी ओव्या गाणारे सत्यवान गावडे महाराज यांच्या टीमने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा कार्यइतिहास सवाद्य ओव्यांच्या माध्यमातून अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने सादर करीत निफाडनगरी दुमदुमून टाकली. यावेळी आहिल्यादेवी आरती व फोटो उपस्थितांना वाटण्यात आले.तसेच इतिहास अभ्यासक रामदास काळे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र व होळकर शाहिच्या इतिहासावर व्याख्यान झाले. यावेळी व्याख्याते काळे यांनी अहिल्यादेव...

बागलाण तालुक्यात प्रहारच्या विविध गावांमध्ये जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या हस्ते शाखांचे अनावरण

Image
बागलाण : प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या शाखा फलकाचे अनावरण बागलाण तालुक्यातील दरेगाव, अंबासन व उतराणे या ठिकाणी प्रहार दिव्यांग संघटना नाशिक चे जिल्हाध्यक्ष  ललित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, प्रारंभी अंबासन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष  ललित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, प्रहार ची पाळेमुळे खोलवर रुजली असुन दिव्यांग कल्याण राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु नी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाल्याचे जिल्हाध्यक्ष  ललित पवार यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले, अंबासन ग्रामपंचायतीने दिव्यांगांसाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून दिल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे ही पवार यांनी आभार मानले, या वेळी उपस्थित दिव्यांगांना विविध शासकीय योजनांची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष बबलु मिर्झा यांनी दिली, या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  ललित पवार, कार्याध्यक्ष  बबलु मिर्झा तालुकाध्यक्ष नाना कुमावत,तालुका उपाध्यक्ष हिम्मत माळी शहराध्यक्ष प्रकाश पगार, संघटक किरण गांगुर्डे शाखाप्रमुख दि...

ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव व पालक मेळावा संपन्न

Image
आंबेगण ( प्रतिनिधी समाधान शिरसाठ )- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आंबेगण येथे दि.१५ जुन २०२३ गुरुवार रोजी विद्यार्थी प्रवेशोत्सव व पालक मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र गायकवाड (अध्यक्ष शा.पो.आ.) तर प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नाशिक येथील  शरद निळे साहेब, ग्रा.पं.आंबेगण येथील सरपंच  सुरेश वाघ व पालक सदस्य  राजु कलवर उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती चौधरी यांनी इशस्तवन तर शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक  संदिप कुमावत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शाळेचा परिचय व शाळेचा विकासाचा आलेख स्पष्टपणे सांगितला. या कार्यक्रमात दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम आलेल्या तिन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.  आलेल्या सर्व विद्यार्थी व पालक यांच्या साठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या...

येवला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुथ कमिट्यांची आढावा बैठक संपन्न

Image
येवला : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  छगन भुजबळ  यांच्या सूचनेनुसार येवला मतदारसंघाची बूथ कमिट्यांची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस  दिलीप खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे,विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष वसंत पवार,तालुकाध्यक्ष  साहेबराव मढवई,शहर अध्यक्ष  दिपक लोणारी,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती  किसन धनगे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक  संजय पगार,युवक शहराध्यक्ष शहा,माजी पंचायत समिती मोहन शेलार,मकरंद सोनवणे,सुनील पैठणकर,ज्ञानेश्वर शेवाळे,गोटू मांजरे,सुमित थोरात, दीपक गायकवाड,विजय जेजूरकर,सचिन सोनवणे,धनराज पालवे, शाम बावचे,अमोल पाबले,देविदास शेळके,बाळासाहेब गुंड,भगिनाथ पगारे, दिपक पवार,वाल्मीक कुमावत,निसार निंबुवाले,सौरभ जगताप,राकेश कुंभारे, मलिक मेंबर,संजय पवार,नितीन आहेर,प्रमोद भागवत,बाळासाहेब शिंदे,भाऊसाहेब धनवटे,संतोष खैरनार, अँड बाबासाहेब देशमुख, नवाज मुळतानी,अरुण शिरसाठ,देविदास पिंगट,योगेश तक्ते,तुळशीराम कोकाटे,शकील पटेल, अशोक ...

भगुरला जेष्ठ नागरिक समस्या सोडविण्यासाठी एकत्रिकरण सोहळा संपन्न

Image
भगुर : आर्थिक सुबत्ता,वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे वयोमर्यादा वाढली आहे,त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढत आहे.पण वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे.अशाच काही अडचणी सोडविण्यासाठी स्वराज्य सोशल ग्रुप नाशिक,जेष्ठ नागरिक संघटना भगूर व राष्ट्रीय समाजसेवक पुरस्कार विजेते अमोल भागवत, यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिक एकत्रिकरण सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी भगूर जेष्ठ नागरिक संघटनेचे दादासाहेब देशमुख उपस्थित होते, स्वागत अध्यक्ष कामगार नेते अमोल भागवत, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे, समाजसेवक मंदार तारगे, आध्यात्मिक मार्गदर्शन व उद्योजक गणेश निसाळ, भगूर शिवसेना शहराध्यक्ष विक्रम सोनवणे, युवा नेते पवन गोडसे, युवा नेते योगेश भोर, बँक संचालक राजाभाऊ जाधव, कुशल वक्ते दिनेश गोविल, दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष किसन खताळे, डीजीपी नगर ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष वैशाली पिंगळे, देवळाली कॅम्प जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष कौशल्या मुळाने, गोविंद नगर ज्येष्ठ नागरिक ...

पशुसंवर्धन विभाग अधिकारी यांचा यशवंत सेनेच्या वतीने सत्कार

Image
सटाणा : सटाणा येथे झालेल्या कार्यक्रमात यशवंत सेनेच्या वतीने पशुसंवर्धन अधिकारी यांचा सत्कार सटाणा येथे पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉ बी आर नरवडे नाशिक विभाग. डॉ जी आर पाटील उपायुक्त पशुसंवर्धन विभाग,डॉ श्री संजय शिंदे,पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉ संजय शिंदे यांनी मेंढपाळ बांधवांना व पशुपालन करणारे लोकांना आमचा विभाग सहकार्य करेल व विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध केली जाईल असे यावेळी सांगितले.याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र प्रमुख अरुण दादा शिरोळे,बापु मोरे,जिल्हा प्रमुख नासिक बारकु ठोंबरे, उपजिल्हाप्रमुख आण्णासाहेब गोयकर रासपचे केदा ढेपले, ग्रा प सदस्य गंगाराम कांदळकर,कैलाश बच्छाव,डॉ दिघे डॉ रुद्रवंशी,डॉ तवले, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डांग सेवा मंडळ संचलित ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,आंबेगण येथे कार्यशाळा

Image
दिंडोरी : डांग सेवा मंडळ संचलित ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,आंबेगण येथे दि. १४ जून २०२३ रोजी डांग सेवा मंडळ संचलित दादासाहेब बिडकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पेठ व ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,आंबेगण यांच्या संयुक्त विद्यमाने नैतिक सक्षमता आणि ज्ञानाचे सौंदर्य व संक्रमण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेचे उद्घाटक डांग सेवा मंडळ संचलित दादासाहेब बिडकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माजी. प्राचार्य डॉ.आर.बी.टोचे सर हे होते तर कार्यशाळेच्या अध्यक्ष मा. श्रीमती हेमलताताई बिडकर मॅडम ह्या होत्या.प्रा.श्री.नवनाथ बोंबले व योग शिक्षक मा. श्री. सुनिल अहिरे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तसेच ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,आंबेगण चे मा.मुख्याध्यापिका सौ.छाया पाटील मॅडम (प्राथ.विभाग)व मा.मुख्याध्यापक मा. श्री.संदीप कुमावत सर (माध्य .विभाग)आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन झाल्यावर मान्यवरांच्या सत्कार समारंभानतंर लगेचच कार्यशाळेला सुरुवात 'माणसाने म...