महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षणसंस्था महामंडळाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब क्षीरसागर
महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षणसंस्था महामंडळाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब क्षीरसागर
नाशिक : महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षणसंस्था महामंडळाच्या नाशिक (शहर) जिल्हाध्यक्षपदी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षणसंस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा नूतन कार्यकारणीची निवड करण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात आली होती. या कमिटीने एकमताने नूतन कार्यकारिणीची निवड केली आहे. नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील मोहनलाल चोपडा, सचिवपदी बाळासाहेब ढोबळे यांचीही निवड करण्यात आली आहे. या बैठकीस कोंडाजी आव्हाड, बाळासाहेब पाटील, केशव पाटील, मनोहर बोराडे यांसह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थाचालक उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
Comments
Post a Comment