डॉक्टर,शेतकरी व सीए दिन उत्साहात साजरा लायन्स क्लब ऑफ पिंपळगाव बसवंततर्फे प्रेरणादायी सन्मान सोहळा नाशिकमध्ये संपन्न
नाशिक :- लायन्स क्लब ऑफ पिंपळगाव बसवंततर्फे डॉक्टर, शेतकरी आणि चार्टर्ड अकाउंटंट दिन मोठ्या उत्साहात हॉटेल देवी इंटरनॅशनल, नाशिक* येथे साजरा करण्यात आला.समाजाच्या आरोग्य, शेती आणि आर्थिक व्यवस्थेतील योगदानासाठी या तीन क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात १० डॉक्टर्स, १० प्रगतशील शेतकरी आणि १० चार्टर्ड अकाउंटंट्स यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा टाळ्यांच्या गजरात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सूर्यवंशी, यांनी आरोग्य सजगतेबाबत मार्गदर्शन केले.सीए रोहित राठी यांनी तरुण उद्योजकतेतील संधी व कर साक्षरतेबाबत विचार मांडले. कृषीतज्ज्ञ भूषण निकम यांनी जैविक शेती आणि ब्रँडिंगबाबत माहिती दिली, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चैतन्य बैरागी यांनी सरकारी आरोग्य योजनांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संयोजन पिंपळगाव बसवंत क्लबचे अध्यक्ष लायन संदीप हिरे, झोन चेअरमन लायन राजेंद्र कोठावदे, उपाध्यक्ष व संयोजक लायन महेंद्र शेवाळे, सचिव लायन रविराज पाटील, खजिनदार लायन ज्ञानेश्वर लामबे, माजी झोन चेअरमन लायन सतीश अलई आणि ला. बापू आहिरे यांनी केले. झोन चेअरपर्सन ला. राजेंद्र कोठावदे यांच्यासह पिंपळगाव बसवंत क्लबचे अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित* होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष ऊर्जा आणि उत्साह लाभला.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत, सामूहिक छायाचित्र आणि आभार प्रदर्शनाने झाला.
Comments
Post a Comment