डीजीजीआय बंगळुरू युनिटने 266 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या असलेल्या सहा बनावट कंपन्यांचा केला पर्दाफाश
डीजीजीआय बंगळुरू युनिटने 266 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या असलेल्या सहा बनावट कंपन्यांचा केला पर्दाफाश , ज्यात 48 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट क्रेडीटचा समावेश,मुख्य सूत्रधाराला अटक
नवी दिल्ली, 11 जुलै :- बंगळुरूमध्ये एका प्रकरणाच्या चौकशी संबंधित पाठपुरावा कारवाईत, जीएसटी गुप्तचर विभाग, बंगळुरू विभागीय युनिट महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत सहा हून अधिक ठिकाणी छापे टाकले आणि 266 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट पावत्या जप्त केल्या ज्यामध्ये बनावट कंपन्यांद्वारे 48 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळवणे आणि ते इतरांना देणे समाविष्ट होते.मुख्य सूत्रधाराने प्रत्यक्ष व्यवसाय नसलेल्या बनावट कंपन्या सुरू केल्या, उलाढाल वाढवण्यासाठी सर्क्युलर ट्रेडिंग केले, यातील एका कंपनीला शेअर बाजारात सूचीबद्ध केले आणि आयटीसी घोटाळा केला.तपासात आढळून आले की, कोणताही व्यवसाय नसलेल्या चार कंपन्यांनी शेकडो कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवांच्या पावत्या दाखवल्या आहेत. तपासात असे दिसून आले की सुरुवातीला, मुख्य सूत्रधार सीए/वैधानिक लेखापरीक्षकांपैकी एक होता, जो या कंपन्यांचे व्यवहार हाताळत होता. अधिक तपास केला असता संस्थांची रचना आणि शेअरहोल्डिंग पॅटर्न, तसेच त्यात बदल करून, सीए/वैधानिक लेखापरीक्षक काही काळ यातील काही बनावट कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करत होते असे दिसून आले ज्यामुळे सहा बनावट कंपन्यांच्या स्थापनेमागील दुवे स्पष्ट झाले. या कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये शोध घेतल्यावर, सूत्रधाराच्या कार्यालयात इनव्हॉइस आणि सीलसारखी मूळ कागदपत्रे आढळून आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.डीजीजीआय बंगळुरू विभागीय युनिटने या फसवणुकीचा व्यापक तपास सुरू केला आहे, ज्याचा परिणाम सूचीबद्ध कंपन्यांमधील प्रामाणिक गुंतवणूकदारांवर होऊ शकतो.सूचीबद्ध कंपन्यांनी सर्क्युलर ट्रेडिंग आणि बनावट आयटीसी वापरून जीएसटी फसवणुक केल्याचा प्रकार आढळल्यानंतर, डीजीजीआयने अलिकडच्या काळात सेबी कायद्यांतर्गत कारवाई सुरू करण्यासाठी विशिष्ट माहिती सेबीसोबत सामायिक केली आहे.
Comments
Post a Comment