ब्राह्मणगाव येथून सालाबादप्रमाणे भव्य साई पालखीचे शिर्डीच्या दिशेने प्रस्थान
बागलाण :- तालुक्यातील ब्राम्हणगाव येथुन आषाढी एकादशी निमित्त साई बाबांची पालखी शिर्डीकडे रवाना झाली आहे.यावेळी ब्राम्हणगावासह परिसरातील साई भक्तांनी पालखी सोहळ्यात सहभागी होत साईबाबांच्या नावाचा जयघोष केला.महाराष्टातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात साईबाबांच्या सानिध्यामुळे पावन झालेल्या शिर्डी नगरीत साई दर्शनासाठी आषाढी एकादशीला लाखो भाविक साई दर्शनासाठी येत असतात.सबका मालिक एक, तसेच श्रद्धा अणि सबुरी, हा संदेश भक्तांना देणारे एक अलौकीक संत म्हणजे शिर्डीतील साईबाबा,दैवीशक्तीचा अनुभव बाबांच्या आवतार काळात सर्वच भक्तांनी घेतला आहे.साईबांबाचे भक्त महाराष्ट्रासह देश विदेशात असुन ठिकठिकाणच्या अनेक भागातून लाखो भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपले सुख दुख,सांगण्यासाठी,नवस फेडण्यासाठी साईबाबांच्या चरणी भाविक भक्त नतमस्तक होण्यासाठी शिर्डी साई दरबारी पालखी घेऊन पायी पोहचतात.त्याप्रमाणे ब्राह्मणगाव बागलाण येथून साई भक्त युवकांनी पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे.गावातील पालखी सोहळ्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.युवकांनी गावकऱ्यांनी भक्तांनी गावात भव्य साई मंदीराची उभारणी केलेली असुन नित्य सेवा भजनाचे आयोजन केले जात आहे. गेल्या चौदा वर्षापासून अखंडपणे गावातील साईभक्त युवक आषाडी एकादशीला,निघून पौर्णिमाला शिर्डीत पालखी पोहचेल असे नियोजन करतात चार दिवस आधी हि पालखी शिर्डीकडे प्रस्थान करते, प्रसंगी वाजत गाजत,ढोलताशाच्या गजरात पालखीचे महिला,मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.यावेळी गावातील मुख्य रस्त्याने शिर्डीच्या दिशेने जल्लोषात पालखी निघाली आहे.
Comments
Post a Comment