सर्व यंत्रणांनी समन्वय साधून पंधरा दिवसाच्या आत कामाला सुरवात करावी - उपमुख्यमंत्री अजित पवार


फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला तत्काळ सुरवात करा - मंत्री छगन भुजबळ,फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक
मुंबई,दि.30जुलै 2025:-(समाधान शिरसाठ)अनेक दिवस प्रलंबित असलेला फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती देणे आवश्यक असून येथे पंधरा दिवसात या कामाची तात्काळ अंमलबजावणी होऊन भूसंपादन पार पडले पाहिजे असे मत राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आज पुण्यातील गंज पेठ येथील फुले दांपत्याचे निवासस्थान असलेले "फुले वाडा" आणि त्या जवळच असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या विस्तारीकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात याबाबत बैठक पार पडली. याबैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार हेमंत रासने, माजी खासदार समीर भुजबळ, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय,विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, अतिरिक्त आयुक्त एम. जे प्रदीप चंद्रन पुरातत्व विभागाचे महेंद्र साक्रे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रितेश गवळी, अविनाश चौरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, राज्य सरकारने महात्मा फुले यांच्या फुलेवाड्याच्या विस्तारीकरणासाठी आणि त्याचबरोबर असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी 200 कोटी निधी मंजूर केला आहे. यामध्ये 100 कोटी वितरित देखील करण्यात आलेले आहेत. असे असताना देखील या कामाला अद्याप पर्यंत प्रगती प्राप्त झाली नाही हे काम सुरू झाले नाही. या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला काही अनाधिकृत बांधकाम देखील आहे हे अनाधिकृत असलेले बांधकाम महानगरपालिकेने तात्काळ काढले पाहिजे, त्याचबरोबर एक वेळ निर्धारित करून साधारण पंधरा दिवसाच्या आत मध्ये या कामाला सुरुवात होईल असं नियोजन अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. या बैठकीमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेला सूचना देताना या कामाला दिरंगाई झाली ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आता सर्व यंत्रणांनी समन्वय साधून यामध्ये तात्काळ भूसंपादनाचे काम हातात घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर या वास्तूच्या जवळपास काही खाजगी कार्यालय थाटण्याचा काही लोकांचा मानस आहे त्यामुळे अशी कार्यालय या माध्यमातून होता कामा नये असे निर्देश देखील यावेळी अजित पवार यांनी दिले. यावेळी बोलताना पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणाले की, या स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या जागेमध्ये असलेले अनेक नागरिक हे स्थलांतरित करण्यासाठी तयार आहेत. त्या नागरिकांना प्राधान्याने आपण स्थलांतरित करणार आहोत त्याचप्रमाणे काही नागरिकांना. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) माध्यमातून घरे देता येतील. या जागेची मोजणी देखील पूर्ण झाली आहे. या बैठकीत माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, आत्ताच काही आठवड्यापूर्वी आम्ही पुण्याच्या दौरा केला होता यावेळी या स्मारकाच्या जवळपास असलेले 50 नागरिक असे समोर आले की त्यांचे घर आज पडायला आलेले आहेत आणि ते नागरिक हे घर सोडून स्थलांतरित होण्यास तयार आहेत त्यामुळे या नागरिकांना प्राधान्याने स्थलांतरित करून उर्वरित काम देखील महापालिकेने त्वरित सुरू करावे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन