धुळ्यात उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणीला गती द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


धुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबत विधानभवनात बैठक

मुंबई, दि. १६ : धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब (ड्राय पोर्ट व स्टोरेजसाठी विशेष टर्मिनल) उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी तांत्रिक, आर्थिक व लॉजिस्टिक दृष्टीने व्यवहार्यता तपासावी व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हब उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.धुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबत विधानभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार अनुप अग्रवाल, अपर मुख्य सचिव असिम गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धुळे येथे उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच देवपूर, वलवाडी व सखल भागात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधावा. धुळे शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन डीआय पाईपलाईन टाकणे, औद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प बॅटरी स्टोरेजसह उभारणे, भुयारी मलनिस्सारण योजनेसाठी निधी मंजूर करणे याबाबतही सूचना दिल्या. तसेच, धुळे शहरास दरवर्षी पाणी वितरण व पथदिव्यांसाठी ३२ ते ३३ कोटी रुपयांचा वीज खर्च होत असून, हा भार कमी करण्यासाठी योग्य जागेवर सौर प्रकल्प उभारावेत. शहराचा विस्तार ४६.४६ चौ.कि.मी. वरून १०१.०८ चौ.कि.मी. पर्यंत झाला आहे. त्यामुळे वाढलेल्या हद्दीतील मुलभूत सोयींसाठी नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर करावा, अशीही सूचना त्यांनी दिली.याशिवाय, चाळीसगाव रोडलगत म्हाडाच्या जागेवर शॉपिंग सेंटर उभारणे आणि मौजे धुळे येथे नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला