नाशिक महानगरपालिका २९ अधिकारी,कर्मचारी यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न
नाशिक :- जून २०२५ मध्ये नियत सेवानिवृत्त झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागातील २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सत्कार दिनांक ३० जून २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता राजीव गांधी भवन, मनपा मुख्यालय येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री, यांच्यावतीने उपआयुक्त अजित निकत, विभागीय अधिकारी मदन हीरश्चंद्र,राजाराम जाधव,यांच्या हस्ते खालील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला,वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन रावते,सुरक्षा अधिकारी संजय कुलकर्णी,बाळु शार्दुल,मनोज पांडे,चंद्रकांत घाटोळ,नारायण भांगरे,अन्य स्वेच्छानिवृत्त अधिकारी व कर्मचारी.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे यांनी केले.यावेळी उपआयुक्त अजित निकत, विभागीय अधिकारी मदन हरीश्चंद्र, राजाराम जाधव, नितीन बागुल, आनंद भालेराव, गोपीनाथ हिवाळे, वैभव कुलकर्णी, विरसिंग कामे, साहिल बोडके आदी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या वतीने सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
देण्यात आल्या.
Comments
Post a Comment