आसाम येथील १५ वर्षाच्या हिंदू अल्पवयीन मुलीस पळून नेणाऱ्या २० वर्षाच्या युवकास अटक

ना.रोड :- शामलू परमेश्वर शाह, राहणार तिनसुकीया तालुका जिल्हा तिनसुकिया राज्य आसाम यांनी त्यांची १५ वर्षांची भाची नाव अनामिका हि दि.१६/०७/२०२५ पासून पहाटे ४:०० वाजता बेपत्ता होती. तक्रारदाराला संशय होता की, समीर अली नावाच्या इसमाने त्यांची भाचीला फूस लावून पळून नेले.त्यानुसार, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिनसुकिया पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६१/२०२५ कलम ८७ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.होता तपासादरम्यान असाम येथील पोलीसांना समजले की आरोपीत पीडित मुलगी ही महाराष्ट्र मुंबईच्या दिशेने ट्रेन प्रवास करत आहे.याबाबत आसाम येथील पोलिसांनी दि. १८/०७/२०२५ रोजी रेल्वे सुरक्षा बल नाशिक रोड व रेल्वे पोलीस नाशिक रोड यांना सदर गुन्ह्याची माहिती देऊन पीडित मुलीचा शोध घेऊन आरोपी पकडण्याबाबत सांगितले असता रेल्वे स्टेशनला पोलीसांनी मुंबई ला जाणारी दिब्रुगड रेल्वे गाडीत शोध घेतला असता पीडित मुलगी मिळून आली तिला नाशिक उंटवाडी येथील मुलींचे निरीक्षण गृह मध्ये दाखल करण्यात आले. तिला आसाम पोलीस यांनी समक्ष विचारपूस केली असता आरोपीत समीर अली, हा‌ मुंबई येथे तिला पळवून घेऊन जात असल्याचे सांगितले. आरोपीताचे मोबाईल चे लोकेशन रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथील दिसून आल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांना त्याचा शोध घेणे कामी मदत मागितल्याने, GRP व RPF पोलिस हे आरोपीचा शोध घेत असताना आरोपीत हा रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथील मेन गेट परिसरात मिळून आल्याने त्यास पोलीस स्टेशन आणून त्यास अटक करण्यात आली आहे.त्याला आसाम येथे पुढील कार्यवाही साठी नेण्यात आले.सदरची कार्यवाही स्वाती भोर, पोलीस अधिक्षक, रेल्वे छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय लोहकरे, यांचे मार्गदर्षनाखाली रे.पो.स्टे. नाशिकरोड येथील प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन बनकर, सहाय्यक फौजदार 69 संतोष उफाडे पाटील, पो.हवा. 520 शैलेंद्र पाटील, पो.हवा. 217 राज बच्छाव, पो शि . 307 सुभाष काळे व रेल्वे सुरक्षाबल नाशिकरोड येथील निरीक्षक नविनकुमार सिंह, दिनेश यादव,आरक्षक मनिशकुमार, सागर वर्मा, के.के. यादव आणि आसाम येथील S.I. जुनाली हजारिका यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन