वाढदिवसाच्या अवास्तव खर्चाला फाटा निराधारांना दिलासा,ॲड.साहिल ठाकरे यांच्या हस्ते आरोग्य किट वाटप


ॲड. साहिल ठाकरे यांनी केअर सेंटरमध्ये वाटप केले आरोग्य किट
नाशिक  :-  हल्ली वाढदिवस म्हटला कि, शुभेच्छा संदेश देणारे मोठमोठे फलक चौकाचौकांत पहायला मिळतात. अलिशान हॉटेल, फार्महाउसमध्ये जंगी पार्ट्या करून वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले जाते. परंतु या सर्व अवास्तव खर्चाला फाटा देत वाढदिवसाला वेगळी दिशा देण्याचे कार्य नाशिकमधील निष्णात वकील साहिल ठाकरे यांनी केले आहे. आपणही समाजाचं देणं लागतो, या उदात्त भावनेतून त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे एक वेगळा आदर्श उभा केला आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन बाबुराव ठाकरे यांचे चिरंजीव असलेले ॲड.साहिल ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळीवेगळी सामाजिक बांधिलकी जपल्याचे पहायला मिळाले. साहिल ठाकरे यांनी नाशिक येथील ‘दिलासा केअर सेंटर’ला भेट देत निराधार आजी-आजोबांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला.सेंटरमधील निराधार आजी-आजोबांनी साहिल यांचे औक्षण केले आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी साहिल यांच्या हस्ते निराधार ज्येष्ठ नागरिकांना गरजेच्या आरोग्यविषयक वस्तू देत त्यांनी  त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.याप्रसंगी आजी-आजोबा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी विशाल गवळे, मयूर हांडगे, चेतन बोराडे, हेमंत सूर्यवंशी यांच्यासह ‘दिलासा’ सेंटरच्या संचालक उज्वला सतीश जगताप, व्यवस्थापक सुजय नागले व दिलासा केअर सेंटरचे कर्मचारी आणि आजी-आजोबा उपस्थित होते.साहिल ठाकरे यांचा हा अनोखा सामाजिक उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन